Akola crime: अनैतिक संबंधातून विवाहित महिलेची हत्या: आरोपीने केला आत्महत्येचा प्रयत्न

   घटनास्थळ 




भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला:  जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुका मधील माना गावात एका प्रियकराने विवाहित महिलेचा गळा चिरून खून केल्याची घटना मंगळवारी घडली. या घटनेला अनैतिक संबंधाची किनार असल्याचे बोलल्या जात आहे.



माना येथील मृत महिला अकोट तालुक्यातील लोहरी गावातिल या मारेकरीच्या संपर्कात आली आणि त्यातून त्यांची ओळख झाली होती. घटनेच्या दिवशी महिला घरात एकटी असल्याचा फायदा घेत आरोपी महिलेच्या घरात शिरला आणि आतून दार बंद केलं. दोघांमध्ये वाद झाला आणि आरोपीने महिलेच्या गळ्यावर आणि पायावर चाकूने वार करून तिची हत्या केल्याचे उघडकीस आले. या घटनेत महिलेचा यात जागीच मृत्यू झाला. यानंतर आरोपीने स्वतःही आपला गळा चिरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गंभीर रित्या जखमी झालेल्या आरोपीचा अकोला येथील रुग्णालयात उपचार सुरू असून माना पोलीस अधिक तपास करीत आहे.




घटना पोलिस स्टेशन माना (अकोला) हद्दीत घडली. फिर्यादी राजू रामाजी लांडे, (वय 38 वर्ष, रा.खाटीकपुरा, माना टाऊन, पो स्टे माना) असून आरोपींवर कलम 302, 309 भा दं वि. नुसार गुन्हे दाखल करण्यात आले. घटनास्थळ मृतक शोभना गजानन लांडे हीचे राहते घरी, खाटिकपुरा, पो. ठा. माना असून आरोपीचे नाव अनिल श्रीकृष्ण तायडे, (वय 42 वर्ष, रा.लोहारी, अकोट ग्रामीण, जिल्हा अकोला) आहे. मृतक महिलेचे नाव,(शोभना गजानन लांडे, वय 32 वर्ष, रा.खाटीकपुरा, माना टाऊन, अकोला) आहे.


सूत्रांकडून प्राप्त माहिती नुसार,  फिर्यादी आणि मयत नात्याने दिर भावजय असून एकमेकांचे घरा शेजारी राहतात. यातील आरोपी आणि मयत हिचे अनैतिक संबंध होते. मयताचे पती गजानन रामाजी लांडे, (वय 42, वर्ष) हे वडगाव (पो स्टे धनज) येथे कामाला गेले असताना मयत आणि आरोपी मयताचे घरी सुमारास होते, आणि दरवाजा आतून बंद होता. आरोपी आणि मयत यांचे आरडाओरडा करण्याचा आवाज फिर्यादीस व इतर लोकांना आल्याने फिर्यादी आणि इतर लोकांनी मयताचे घराचे खिडकी तोडून आत प्रवेश केला असता, मयत आणि आरोपी रक्ताचे थारोळ्यात पडलेले होते. आणि फिर्यादीचे उजवे हात जवळ धारधार चाकू होता. आरोपीने मयताचे गळ्यावर तसेच शरीरावर धारधार चाकूने जख्मा करून मयताला जीवाने ठार मारले. तसेच स्वतःच्या गळ्यावर पण चाकूने घाव मारून स्वतःच्या आत्महत्येचा प्रयत्न केला, अशा फिर्यादीचे रिपोर्ट वरुन गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला वैद्यकीय उपचार कामी सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे भरती करण्यात आले आहे.

टिप्पण्या