Akola crime: “तुम्ही माझ्या आई सारख्या आहात” म्हणत महिलांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; दोन आरोपी जेरबंद





भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 


अकोला:  पोलीस स्टेशन जुने शहर अकोला येथील महीलेची फसवणूक करणारे ०२ आरोपीना स्थानिक गुन्हे शाखा अकोला कडून ४८ तासात वर्धा येथून अटक करण्यात आले. अटक केलेले आरोपी हे वर्धा येथील रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहेत. आरोपींनी अकोला जिल्ह्यातील केलेले ०३ गुन्हे तर यवतमाळ जिल्हयातील ०१ गुन्हा कबूल केला आहे. स्थानीक गुन्हे शाखेचे अधिकारी अमंलदार यांचे कडून गोपनिय खबरीच्या आधारे, वर्धा LCB च्या समन्वयाने ४८ तासात आरोपींना अटक करण्यात यश मिळाले आहे. आरोपी हे “ तुम्ही माझ्या आई सारख्या आहात” असे म्हणून बोलण्यात भुलवून महिलांची फसवणूक करीत असत. या

आरोपींचा टोळी ही पोलीसांनी पहिल्यांदाच उजेडात आणली आहे,हे विशेष.  स्थानिक गुन्हे शाखा, अकोला येथील पथकाने सदर गुन्हा घडल्यानंतर गोपनिय बाबतमीदाराकडून गुन्हा उघड आणून आंतरजिल्हा गुन्हे करणा-या टोळीस जेरबंद करण्यात यश मिळविले आहे.



याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक १७/०१/२४ रोजी फिर्यादी मायाबाई राजु खुळे (वय ३४ वर्ष रा. गाडगे नगर, अकोला) यांनी रिपोर्ट दिला की, घटना वेळी आणि ठिकाणी त्या किल्ला चौका कडुन घरी जात असता, अनोळखी ईसम त्याचे जवळ येवून म्हणाले की, तुम्ही माझे आई सारख्या आहात पोळा चौकाकडे साड्या वाटप करीत आहे. तुम्ही माझे सोबत चला असे म्हटल्याने मायाबई त्याचे सोबत गेली असता काल भैरव मंदीराजवळ गल्लीमध्ये मायाबाईस त्यांनी गळ्यातील सोन्याचे दागिने काढायाला सांगितले, मायाबाईने तिच्या गळयातील दागिने काढून पॉकेट मध्ये ठेवली. तेव्हा पॉकेट मधील नगदी ३०००/-रू व सोन्याची मनी असा एकुण ८०००/- रू. चा माल दोन अनोळखी ईसम घेवून गेले, अश्या फिर्यादी माया बाईचे जबानी रिपोर्ट वरून पो.स्टे जुने शहर अकोला येथे अपराध क्रमाक ८०/२४ कलम ४२०,३४ भा.दं.वि चा नोंद करण्यात आला. या घटनेने महिला वर्गात भिती निर्माण झाली होती.


जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी या गुन्ह्यातील अज्ञात आरोपी यांना निष्पन्न करण्याबाबत पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी आदेशीत केले असता, स्थानीक गुन्हे शाखा प्रमुख यांनी एक पथक गठीत करून त्यांना मिळालेली गोपनिय माहीतीदार यांचे बाबत मार्गदर्शन करून सदर गुन्हयातील अज्ञात आरोपी निष्पन्न करण्याबाबत आदेशीत केले. पथकाने गोपनिय यंत्रणा अमलात आणून गुन्हयातील आरोपी सुरज मिश्रीलाल कंजरभाट (वय ३६ वर्ष रा. ईतवारा बाजार पोलीस चौकी समोर वर्धा), सुनिल ईश्वर नेतलेकर (वय ४३ वर्ष रा. ईतवारा बाजार, कंजर मोहल्ला पोलीस चौकी समोर वर्धा) यांनी हा गुन्हा केल्याचे निष्पन्न करून, त्यांना वर्धा येथून ताब्यात घेवून त्यांचे कडून गुन्ह्यातील वाहन हस्तगत करण्यात पोलीसांना यश आले.



पोलिसांनी आरोपींची सखोल विचारपूस केली असता, आरोपी हे अश्या प्रकारे गुन्हे करण्याचे सवयीचे असून त्यांनी मागिल ०५ वर्षा पासून अकोला जिल्ह्यात व इतर जिल्हयात अश्या प्रकारे बतावणी करून फसवणूकीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामध्ये त्यांनी अकोला जिल्हयात केलेल्या गुन्हयाचे अभिलेखावर पाहणी केली असता, त्यामध्ये पोलीस स्टेशन रामदास पेठ अकोला येथील अप नं ४८४/२२ कलम ४२० भादंवि आणि पो.स्टे जुने शहर अप.नं ३९१/२२ कलम ४२०,३४ भादंवि, पोस्टे बाभुळगाव जि. यवतमाळ अप नं ५८०/२२ कलम ४२०, ३४ भादंवि अश्या प्रकारचे दाखल असून त्यांनी सदर गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. आरोपीतांची टोळी ही पोलीसांनी पहिल्यांदाच उजेडात आणली आहे. स्थागुशा, अकोला येथील पथकाने सदर गुन्हा घडल्यानंतर गोपनिय बाबतमीदाराकडून सदर गुन्हा उघड आणून आंतरजिल्हा गुन्हे करणा-या टोळीस जेरबंद करण्यात यश मिळविले असून आरोपीतांना पुढील तपास कामी पोलीस स्टेशन जुने शहर यांचे ताब्यात दिले आहे.


कारवाई ही पोलीस अधीक्षक अकोला बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक  अभय डोंगरे , पो.नि  शंकर शेळके स्थागुशा अकोला, यांचे मार्गदर्शनात सपोनि. कैलास डी. भगत, पोउपनि. गोपाल जाधव स्थागुशा. पो. अमंलदार रविंद्र खंडारे, अब्दुल माजीद, महेंद्र मलिये, अविनाश पाचपोर, वसीमोद्दीन शेख, एजाज अहेमद, विशाल मोरे, भिमराव दिपके, यांनी केली असून स्थानीक गुन्हे शाखा वर्धा यांचे सहकार्य लाभले.



पोलीस विभागातर्फे आवाहन 

सद्या मकरसकांती निमीत्याने महिला वर्ग हळदी कंकूच्या कार्यक्रमासाठी किमती आभूषणे दागिने परिधान करून जाण्याची प्रथा आहे. त्यासाठी पोलीसांकडून दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

टिप्पण्या