- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
ॲड. नीलिमा शिंगणे जगड
अकोला : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी अकोला शहरात एका निष्पाप विद्यार्थ्याची हत्या झाली होती. पंधरा दिवसही उलटत नाही तोच आज पुन्हा क्षुल्लक कारणावरून एका युवकाची हत्या झाल्याचे उघडकीस आले.
या घटनेने अकोला शहर पुन्हा हादरले आहे.
अकोला शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील जुना केरोसीन डेपो जवळ एका युवकाची हत्या झाल्याचे समोर आले. हा युवक निर्मनुष्य जागी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला.
या युवकाची हत्या धारदार शस्त्राने डोक्यावर जोरदार वार केल्यामुळे झाल्याचं प्रथमदर्शी दिसून येत आहे.
मृतक हा शहरातील दुबेवाडी येथील राहणारा असून, मनोज कामेल्लू असं नावं असल्याचं सामोर आले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा युवक मित्रासोबत दारू पित असताना दारूच्या वादातून ही हत्या झाली. स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी या प्रकरणी एका संशयिताला अवघ्या 2 तासात ताब्यात घेतलं असून, पुढील तपास सुरू आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा