- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
अकोला: उरळ पोलीस हद्दीत रात्री गस्त घालत असताना पोलिसांवर फायर करणाऱ्या आरोपींकडून दोन गावठी बंदूक व गुन्ह्यात वापरलेले अन्य साहित्य हस्तगत करण्यात पोलीसांना यश मिळाले आहे.
उरळ पोलीस स्टेशन हद्दीत ३१/१२/२०२३ रोजी पोलीस शिपाई दिनकर इंगळे हे त्यांची पो. स्टे. चे शासकीय वाहन सेकंड मोबाईल क्र.एम एच ३० एच ५४९ चालक पोलीस शिपाई नितेश मुंढे यांचे सह पो. स्टे. परिसरात नाईट पेट्रोलींग ड्युटी करीत असताना, ०२/४० ते ०२/५० वा दरम्यान ग्राम मांजरी फाटा ते कंचनपुर रोड येथे त्यांना दोन मोटार सायकल वर चार इसम संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने, त्यांनी शासकिय वाहनासह नमुद मोटार सायकलचा पाठलाग केला असता, एक मोटार सायकल वरील पाठीमागे बसलेल्या इसमाने त्याचे पाठीवरील लांब शस्त्र काढून पाठीमागे न पाहता लांब शस्त्रामधुन फायर केला होता.
दि.३१/१२/२०२३ रोजी पोलीस शिपाई दिनकर इंगळे यांचे फिर्याद वरून पो.स्टे.ला दोन मोटार सायकल वरील चार अज्ञात इसमा विरुध्द अप नं ४३२/२३ कलम ३५३,३३६,३४ भादंवि सह कलम. ३,२५ आर्म अक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयाचे तपासात कलम ३०७ भा.द.वि.चे वाढविण्यात आले.
सदर गुन्हयाचा तपास सुरू असतांना स्थानिक गुन्हे शाखा पथकाने गोपनीय माहीतीचे आधारे पाच इसमांना ताब्यात घेतले असता, त्यांनी गुन्हा केला असल्याची कबुली दिल्याने आरोपी अश्विन गणेश मुंडे वय २१ वर्ष, भावेश उर्फ अर्जन रविंद्र मुंडाले वय १९ वर्ष, अविनाश भिमराव मुंडाले वय २६ वर्ष, योगेश रामराव मुंडाले वय २६ वर्ष, सर्व रा. ग्राम नखेगाव ता. अकोट जि. अकोला, सागर ज्ञानेश्वर चौके वय २५ वर्ष रा. नेर धामणा ता. तेल्हारा जि. अकोला यांना स्थानिक गुन्हे शाखा पथकाकडून ताब्यात घेउन त्यांना १४/१/२०२४ रोजी अटक करण्यात आली. आरोपींचा विदयमान कोर्ट यांचेकडून २०/०१/२०२४ पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मिळाला होता.
पोलीस कोठडी दरम्यान आरोपिनकडून त्यांनी गुन्हयात वापरलेले दोन गावठी भरमार बंदुका तसेच दोन टॉर्च हस्तगत करण्यात आल्या.
पोलीस अधीक्षक बच्चन सिंह , अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे , सहायक पोलीस अधीक्षक गोकुळ राज यांचे मार्गदर्शनाखाली ही कामगीरी पो. नि. शंकर शेळके स्थानिक गुन्हे शाखा, स.पो.नि. कैलास भगत स्थानिक गुन्हे शाखा, पो.उप.नि. गोपाल जाधव स्थानिक गुन्हे शाखा स.पो.नि. गोपाल ढोले, पो. हवा. अनिल येन्नेवार, पो. हवा. शिवानंद मुळे, पो. हवा. मेहमुद खान, पो.ना. अशोक पटोकार, पो.ना. इम्रान खान, पो.शि. निखील माळी, पो.शि. नंदकिशोर तांदळे, पो.शि. हरिहर इंगळे चालक पो.शि. गणेश खुपसे सर्व पोलीस स्टेशन उरळ यांनी केली.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा