Akola-crime-murder-case: अकोल्यात नववर्षाची सुरूवात हत्याकांडाने! पोटात चाकू खुपसून विद्यार्थ्याचा खून, संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात




भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या कृषी नगर परिसरात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी एका तरुणावर चाकूने हल्ला झाल्याची घटना घडली. जखमी व्यक्तीला नागरिकांनी रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृतक हा जळगाव जामोद येथील रहिवासी असून शिक्षणाकरिता अकोला शहरात राहायला होता,अशी माहिती पोलीस चौकशीतून समोर आली.



मृतक हा शहरातील एका खासगी कोचिंग क्लास मध्ये शिकत होता. तो 

जळगाव जामोद येथील रहिवासी असून विशाल मधुकर झाटे (वय वर्ष 20) असे त्याचे नाव असल्याचे कळते. हा विद्यार्थी कृषि नगर भागात राहत होता,अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.


या विद्यार्थ्याच्या पोटात सोमवारी अज्ञात मारेकरीनी धारदार शस्त्राने वार करून गंभीर त्याला जखमी केले. जखमी अवस्थेत पडलेल्या विशालला स्थानिक नागरिकांनी तत्काळ अकोल्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.  




घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष दुधगावकर, स्थानिक गुन्हे शाखेसह सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.  


अकोला शहरात मागील काही महिन्यांपासून जीवघेणा हल्ला करुन हत्या झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मलकापूर येथे काही दिवसांपूर्वीच बर्थ डे केक रस्त्यावर कापण्याच्या वादातून जीवघेणा हल्ला झाला होता. तर काही दिवसांपूर्वीच सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या कृषी नगर भागातच मिरज सिनेमागृह समोर एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्यानंतर आज 1 जानेवारी रोजी   परत याच भागात तरुणावर जीवघेणा हल्ला होवून, यातच त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे परिसरात भीतीचे  वातावरण निर्माण झाले आहे.  

टिप्पण्या