Akola crime: उरळ पोलिसांवर फायरींग प्रकरणी माहिती देणा-यास 25 हजार रूपयांचे बक्षीस जाहीर





भारतीय अलंकार न्यूज 24

अकोला: पोलीस स्टेशन उरळ हद्दीत ३१ डिसेंबर २०२३ रोजी मांजरी फाटा ते कंचनपुर रोडवर रात्री गस्त दरम्यान मोटर सायकल वरील संशयीत इसमांचा पोलीसांनी पाठलाग केला असता, सदर संशयीत यांनी पोलीसांच्या वाहनावर शस्त्र काढून फायर केला होता. या घटनेतील आरोपींचा अद्याप पत्ता लागला नाही. पोलिसांवर फायर करणाऱ्यांविषयी माहिती देणाऱ्यास  25 हजार रुपयांचे बक्षीस पोलीस विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे.



रात्री घडलेल्या या घटनेवरून पो.स्टे. उरळ येथे अप क. ४३२/२०२३ कलम ३५३, ३३६, ३४ भा.दं. वि. सहकलम ३, २५ आर्म ॲक्टचा गुन्हा दाखल आहे. हा गुन्हा आज पावेतो उघडकिस न आल्याने पोलीस अधिक्षक बच्चन सिंह  व अप्पर पोलीस अधिक्षक  अभय डोंगरे तसेच बाळापुर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी ASP  गोकुळ राज  व स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरिक्षक शंकर शेळके व सोबत पो.उप.नि. गोपाल जाधव व स्था.गु.शा. येथील पथकातील अंमलदार व उरळ येथील ठाणेदार सहा. पोलीस निरिक्षक गोपाल ढोले यांनी घटनास्थळी भेट दिली.पोलीस अधिक्षक यांनी संबधित अधिकारी यांना गुन्हा उघडकिस आणण्याच्या दृष्टीने व तपासाच्या दृष्टीने यावेळी मार्गदर्शन केले.




जो कोणी या घटनेसंबधी माहिती देईल त्याला २५ हजार रूपयांचे बक्षीस जाहिर करण्यात आले आहे. माहिती देणा-यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. किंवा प्रत्यक्ष येवुन स्थानिक गुन्हे शाखा, अकोला, पो.स्टे. उरळ येथील ठाणेदार यांच्या जवळ माहिती देवु शकतात. अथवा स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पो. नि. शंकर शेळके  व पो.स्टे. उरळ ठाणेदार स.पो.नि. गोपाल ढोले  यांच्याशी संपर्क साधावा. संपर्क करणा-याचे नाव व मोबाईल क्रमांक हे गुप्त ठेवण्यात येईल,असे पोलीस प्रशासनाकडून जाहिर करण्यात आले आहे.

टिप्पण्या