Akola crime 2024 : शस्त्र घेवुन फिरणाऱ्या सहा गुन्हेगारांवर कारवाई; हत्यार जप्त





भारतीय अलंकार न्यूज 24

अकोला: जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी अकोला जिल्हयात चोरी, जबरी चोरी, गंभीर मालमत्तेच्या गुन्हयांना आळा घालण्याकरीता व गुन्हेगारावर वचक बसावा ,या करीता मुख्य अमावश्या असल्याने कोम्बींग ऑपरेशन (नाकाबंदी) पोलीस स्टेशन स्तरावर राबविण्यात करीता १ पोलीस अधिकारी व जास्तीत जास्त अमंलदार यांची नियुक्ती करावी असे आदेशित केले होते. त्या अनुषंगाने  १० जानेवारी २०२४ चे २२.०० वा ते ११ जानेवारी २०२४ चे. ०५.०० वा पावेतो सर्व पोलीस स्टेशन स्तरावर सर्व पोलीस स्टेशन कोम्बींग ऑपरेशन राबवून कार्यवाही करण्यात आली आहे.




अकोला जिल्हयात राबविण्यात आलेल्या कोंबींग मध्ये एकुण ४३ अधिकारी व २२७ अंमलदार यांनी सहभाग घेतला होता. जिल्हयात एकुण ३२ महत्वाचे ठिकाणांवर नाकाबंदी लावण्यात आली होती. नाकाबंदी दरम्यान दुचाकी तिन चाकी १३३ वाहनचालका विरूदध केसेस करून ६०५००रू दंड वसुल करण्यात आला. नाकाबंदी दरम्यान दुचाकी ३०२ व चारचाकी २३६ वाहने चेक करण्यात आली. समन्स वारंट २९४ ची तामीली करण्यात आली. पोलीस स्टेशन स्तरावरील फरार पाहीजे असलेले ३१ आरोपी चेक केले. त्यामधील पाहीजे असलेल्या एका आरोपीस अटक करण्यात आली.  कलम १२२ मपोका प्रमाणे सिटीकोतवाली व पोलीस स्टेशन अकोट फाईल येथे कारवाही करण्यात आली.  निगराणी बदमाश चेक ५१ तसेच नॉन किमीनल २२ चेक करण्यात आले.  हॉटेल तसेच लॉजेस ६५ चेक करण्यात आले. एटीएम १०५ चेक करण्यात आले. दारू बंदी कायदयान्वये २४ केस करण्यात आल्या. तसेच  जुगार ॲक्ट प्रमाणे दोन केस करण्यात आल्या आहेत.  



याशिवाय पो.स्टे. डाबकिरोड येथे अप. क. ८५/२०२४ कलम ४,२५ आर्म ॲक्ट ,  पो.स्टे. खदान १. अप.क. १०१/२४, २.१०२/२४ कलम ४,२५ आर्म ॲक्ट प्रमाणे, पो.स्टे. कोतवाली ५७/२४ कलम ४,२५ आर्म ॲक्ट,  पो.स्टे. सिव्हील लाईन अप.क. ७६/२४ कलम ४,२५ आर्म ॲक्ट,  पो.स्टे. पातुर अप.क. ७६/२४ कलम ४,२५ आर्म ॲक्ट प्रमाणे एकुण ६ गुन्हेगारावर कार्यवाही करण्यात आली.


शस्त्र बाळगणारे गुन्हेगारांवर  धडक कार्यवाही करण्यात आली असून अशा प्रकारचे गुन्हेगाराबाबत काही माहीती असल्यास आपण नजिकच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा किंवा पोलीस हेल्प लाईन कं११२ वर माहीती कळवावे तसेच स्थानिक गुन्हे शाखा पो. नि. शंकर शेळके तसेच पोउपनि गोपाल जाधव यांना माहीती दयावी, असे आवाहन सर्व नागरीकांना  पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी केले आहे. 



भविष्यात सुध्दा, जिल्हयात रात्री-अपरात्री फिरणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांवर तसेच गुन्हेगारी पार्श्वभुमी असलेल्या इसमांवर अशाप्रकारच्या धडक मोहिम राबवुन गुन्हेगारांवर आळा घालण्याकरीता वेगवेळया अधिनियम अन्वये कार्यवाही करण्यात येईल, असे अकोला पोलीस दला तर्फे सांगण्यात आले.

टिप्पण्या