world-disability-day-celebrate: अकोला येथे जागतिक अपंग दिन उत्साहात साजरा: शहरातून निघाली भव्य रॅली; गुणवंत-यशवंत दिव्यांगांचा गौरव




भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना जिल्हा शाखा अकोलाच्या वतीने ३ डिसेंबरला संघटनेचे कार्यालय , हेड पोष्ट ऑफीस जवळ , अकोला येथे जागतीक अपंग दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. 



सकाळी ११.०० वाजता संघटना कार्यालयाजवळून  बॅंड पथकासह दिव्यांगांच्या भव्य रॅलीला संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय बरडे , सचिव मो . अजीज, कोषाध्यक्ष दिलीप सरदार यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सूरुवात करण्यात आली.रॅली बसस्थानकापासून पं .स. कार्यालयापासून हेड पोस्ट ऑफीस जवळ रॅलीचे विसर्जन करण्यात आले.



यानंतर जागतिक अपंग दिनाच्या मुख्य कार्यक्रमाचे उद्घाटन श्री .बारगीर  गटविकास अधिकारी अकोला यांनी केले. जिल्हाध्यक्ष संजय बरडे यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या कार्यक्रमांत प्रमुख अतिथी प्रदिप सुसतकर, जिल्हा समाजकल्याण अधिकारी अकोला. संघटनेचे सचिव मो. अ.अजीज व सुनिल बोंगीरवार, समाजकल्याण विभाग , अकोला जेष्ठ मार्गदर्शक अविनाश वडतकर, नॅबचे सचिव राम शेगोकार , भा.रा.कॉ.अपंग सेल जिल्हाध्यक्ष सचिन शेजव, भाजपा अपंग सेल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नेरकर हे होते .





दिपप्रज्वलनानंतर कार्यक्रमांस सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमांत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी करणाऱ्या कर्मचारी गुणवंत दिव्यांग पाल्य ,आदर्श शिक्षक व कर्मचारी, गुणवंत खेळाडू तसेच सेवानिवृत दिव्यांग कर्मचारी यांचा गुणगौरव व सत्कार करण्यात आला .



यामध्ये सेवानिवृत दिव्यांग कर्मचारी 

१) नंदकिशोर वैराळे , (क .स.बांधकाम विभाग अकोला )

२ ) गुलाबराव वानखडे , जेष्ठ शि .वि. अ .पं.स. बाXटा )

३ ) अनिल देशमुख, क . शिक्षण वि. अ .पं.स. बार्शी टाकळी )

४ ) रामेश्वर चतरकर, पशुधन पर्यवेक्षक पं .स. अकोला )

५ ) सोहेल परवेज अलि , कृषी अधिकारी जि.प. अकोला

६ )रविन्द्र पिंजरकर, सहा . अभियंता पं .स. पातूर 

७ ) श्री .बी.के. अडबोल .आरोग्य विभाग जि.प. अकोला . यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला .

  

गुणवंत पाल्य गुणगौरव

१ ) हिमांशू सुनिलं कवळे ( इ.१०वी गुणवत्ता प्राप्त )

२ ) कु . तनिष्का प्रविण रोठे ( इ.१०वी गुणवत्ता प्राप्त )

३ ) राम सुधिर कडू ( इ१०वी गुणवत्ता प्राप्त ) .

४ ) कु .निकीता सुभाष पिसे ( इ.१०वी गुणवत्ता प्राप्त )

५ ) अनुराग दिनेश साबळे ( संगीत विषारद )

६ ) ओम राजेश्वर बंड ( नर्सिग गुणवत्ता यादीत अव्वल )

७ ) आकाश हरीदास पाचपोर ( कुस्तीमध्ये विभागीय स्तरावर प्रथम ) 

८) श्रृती कुंजाम ॲबॅकस गोल्ड मेडल मिळाल्याबद्दल  प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देवून गुणगौरव करण्यात आला .


सर्वसामान्य आदर्श शिक्षक, शिक्षकरत्नं पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले

१ ) उमेश हिंम्मतराव सराळे , राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक जि.प. प्रा . शाळा गुंजवाडा पं .स. मुर्तिजापूर

२ )  संगिता मधूकर पांडव , आदर्श जि.प. केंद्रशाळा अडसुळ तालूका तेल्हारा

३ )  अनिल नामदेवराव दाते .स अ . ( जि.प. शाळा नांदखेड ता . पातूर )

४ )  ज्योती शांताराम राठोड स . अ .( आंतरराष्ट्रीय जि.प. केंद्रशाळा वाडेगांव ता . बाळापूर )

५ ) संतोष तूळशीराम बोबडे स . अ .( जि.प. शाळा , राजंदा तालूका बार्शी टाकळी )

६ )  दिगंबर साहेबराव खडसे प . शि .( जि.प. शाळा रौंदळा ता . अकोट )

७ ) श्री अर्जुन मनोहर आप्पा हिंगमिरे .स. अ .( म.न.पा. शाळा क्र .२२ अकोला )

 

गुणवंत दिव्यांग कर्मचारी /शिक्षक यांचाही गुणगौरव करण्यात आला यामध्ये

१ ) तालूका अकोला -डॉ . विजय पांडूरंग वाकोडे प . शि .( PHD ) जि.प. केंद्रशाळा सांगळूद

२ ) तालूका अकोट -संजय रामकृष्ण पडघामोड स.अ .( जि.प. शाळा पुंडा )

३ ) तालुका बाळापूर -सौ . अतियाबी शे . हसन ( स. अ . जि.प. शाळा हातरुण )

४ ) तालुका पातूर  दिनेश उकर्डा मांगूळकर ( स्थापत्य सहाय्यक पं .स. पातूर )

५ ) तालूका बार्शी टाकळी  किशोर ठेंग (अभियंता बांधकाम विभाग )

६ ) तालुका मुर्तिजापूर - संगिता पुरी आरोग्य सेविका ( प्रा .आ. केंद्र कुरूम )

७ ) तालूका तेल्हारा  प्रमोद पुंजाजी पोके स . अ .( जि.प. शाळा हिवरखेड)

८ ) महानगर पालिका अकोला  राजेशकुमार शोभनाथ मिश्रा ( व . सहाय्यक , म न पा अकोला )

९ ) मुख्यालय प्रसाद श्रीपाद रानडे . तलाठी ( जिल्हाधिकारी कार्यालय अकोला ) यांचा सत्कार करण्यात आला 


याशिवाय विविध क्रीडा व खेळामध्ये अकोल्याचे नाव राज्य व राष्ट्रीय स्तरावर उज्वल करणारे अकोला जिल्ह्यातील दिव्यांग खेळाडू

१ ) सचिन मानकर २ ) इर्शाद खान ३ ) अजय डोंगरे ४ ) मोहम्मद अझर ५ ) राजेश चव्हाण ६ ) वैभव सोनोने ७ ) चैतन्य पाठक ८ ) कार्तिक सुर्यवंशी ९ ) रुपेश जाधव १० ) सागर इंगळे ११ ) आनंद घोगलीया १२ ) निलेश वरोठे ( बॉडी बिल्डर ) यांचा गुणगौरव करण्यात आला .यानंतर प्रमुख अतिथीचे मनोगत घेण्यात आले .या सत्राचे संचलन दिपाली रोठे व दिलीप सरदार यांनी तर आभार दिलीप सरदार यांनी मानले .



दुपार सत्रात माधुरी देठे यांचे अध्यक्षतेखाली सर्व महिला संचालिकाच्या उपस्थितीमध्ये दिव्यांग विवाह उत्सुक उपवर मुला-मुलींचे  परीचय सत्र घेण्यात आले.संचलन दिलीप सरदार यांनी तर आभार सुनिल कवळे यांनी मानले .

 



अंतीम सत्रात उद्योजक विवेक पारस्कर ( अध्यक्ष अकोला ग्रिन ब्रिगेड ) तसेच बाळासाहेब नेरकर ( संत गाडगेबाबा सेवाभावी संस्था ) दिलीप सरदार कोषाध्यक्ष, जावेद इक्बाल माध्य. शि. अध्यक्ष यांचे प्रमुख उपस्थितीत गरजू दिव्यांगांना संत गाडगेबाबा संस्थेमार्फत वस्त्र वितरण करण्यात आले. संचलन गणेश महल्ले, व गणेश अत्तरकर यांनी तर आभार सुधिर कडू यांनी मानले .





कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अपंग कर्मचारी संघटनेचे जिल्हा तथा तालूका पदाधिकारी गणेश महाल्ले, गणेश अत्तरकर, दिपक वाघमारे,मुस्ताक पटेल, रामेश्वर कवळे, सुनिल कवळे, अनुप तायडे , रविन्द्र शिरसाठ,रविंद्र देशमुख , संजय कचाले, किशोर तायडे, डॉ.विजय वाकोडे , डॉ.निलीमा आमले , प्रविण फुले, उज्वला शर्मा, माधुरी देठे, शबाना परवीन पटेल, अतियाबी,मिरा डिघोळे, अर्चना देशमुख, अनुराधा शेंडे, दिपाली रोठे,पुष्पा मेटांगे,मिना बोचरे, वर्षा माहुरे,आशा जांभे आदी सह दिव्यांग बेरोजगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष सुधिर कडू, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख,अनिल सरदार, अमोल राठोड, उमेश राठोड, योगेश चतरकर, बंटी सावळे, अमोल इंगळे, देवानंद बांगरे, संदिप हुंडीवाले, हसनराव गवई आदींनी  परीश्रम घेतले . शिस्तबध्द झालेल्या या कार्यक्रमांला जिल्ह्यातील शेकडो दिव्यांग कर्मचारी , अधिकारी व दिव्यांग बांधव उपस्थित होते .

टिप्पण्या