- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
winter-session-2023-nagpur: नागपुर हिवाळी अधिवेशनात केवळ विदर्भातील प्रश्नांना प्राधान्य देवून चर्चा व्हावी - प्रकाश पोहरे
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: विदर्भातील जनतेला न्याय देण्यासाठी नागपुर करार करण्यात आला होता. त्या करारानुसार राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपुर येथे घेणे आणि ते पण किमान ६ आठवड्याचे असावे, असे यात म्हंटले आहे. मात्र आजपर्यंतची अधिवेशने ही ६ ते १० दिवसात आटोपली जातात. अधिवेशनात विदर्भातील मुद्यांवर चर्चा न होता, केवळ पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा येथील समस्यांवर चर्चा होते. या अधिवेशनात विदर्भातील प्रश्न, समस्यांवर प्राधान्याने चर्चा केल्या गेली पाहिजे. यावर्षीच्या अधिवेशनात क्षुल्लक विषयांवर चर्चा करून अधिवेशन पार पाडले जात आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षण आणि जरांगे पाटिल व छगन भुजबळ यांच्यावरच चर्चा करण्यात वेळ वाया घालवला गेला आहे. त्यामुळे विदर्भ मुद्यांवर चर्चा करण्यासाठी नागपुर करारा नुसार अधिवेशन घेतले जात नसल्याचा आरोप ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे यांनी केला.
नागपुर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात प्रकाश पोहरे यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला गेला. लोकशाही असलेल्या या देशात पत्रकारांचाच आवाज दाबल्या जात आहे, असा एकंदरीत प्रकार प्रकाश पोहरे यांच्या सोबत गुरुवारी झाला. या पार्श्वभूमीवर प्रकाश पोहरे यांनी आज अकोल्यात तातडीची पत्रकार परिषद बोलवली होती. यावेळी ते बोलत होते.
विदर्भात कोळसा खाणी आहेत. विद्युत निर्मिती सुध्दा विदर्भात अधिक प्रमाणात होत असताना विदर्भातील जनतेला महागडी वीज विकत घ्यावी लागते. हा विदर्भ वासियांवर अन्याय आहे,असे देखील प्रकाश पोहरे म्हणाले.
स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी ११७ वर्षे पासुन आहे. मात्र अद्यापही राजकिय उदासीनतेमुळे पुर्ण केली जात नाही. सुधीर मुनगुंटीवार, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांनी जिंकून आल्यास वेगळा विदर्भ करणार ,असे विदर्भ वासीयाना ग्वाही दिली होती. मात्र अजूनही यासाठी त्यांनी प्रयत्न केला नाही, असे प्रकाश पोहरे यांनी सांगितले.
हिवाळी अधिवेशन नागपुरात घेताना नर्तकी गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आयोजीत केला गेला . यावरून राज्याचे मंत्री, आमदार केवळ सहल म्हणुन अधिवेशनात एन्जॉय करण्यासाठीच येतात, असा आरोप पोहरे यांनी केला.
विदर्भातील आमदार विदर्भातील जनतेच्या प्रश्नांवर बोलत नसल्याने माझ्या सारख्या पत्रकाराला हाऊस मध्ये बोलावे लागत आहे. राज्याचे मंत्रिमंडळ विदर्भात नागपुरला येत असतील तर केवळ विदर्भ आणि विदर्भातील जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करा अन्यथा आम्हाला आमचे स्वतंत्र विदर्भ राज्य द्या, अशीही मागणी प्रकाश पोहरे यांनी केली.
विधानसभेत गुरूवारी मराठा आरक्षणावर चर्चा झाली. सभागृहाचे कामकाज उशिरापर्यंत सुरू होते सायंकाळीही कामकाज सुरु होते. या प्रश्नावर चर्चा करायची असेल तर अधिवेशनाचा कालावधी वाढवावा किंवा या विषयावर मुंबईत स्वतंत्र अधिवेशन बोलवा, अशीही सूचना केली. पत्रकार गॅलरीत येऊन तालिका अध्यक्षांकडे पाहात हातवारे करीत विदर्भाबद्दल का बोलत नाही, अशी विचारणा केली. मात्र यावर आक्षेप घेवून पत्रकारांचा आवाज दाबण्यात आला. मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आणि वेगळा विदर्भ साठी हा आवाज उठतच राहील, असा निर्धार पोहरे यांनी बोलून दाखविला. यासाठी येत्या २७ डिसेंबर रोजी नागपुर येथील संविधान चौकात आंदोलन सुरू करण्यात येईल ,अशी माहिती पोहरे यांनी यावेळी दिली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा