suicide case: कुळदेवीचे दर्शन घेवून चिमुकल्या सह मातेने संपविली जीवन यात्रा




ठळक मुद्दे 

वर्धा येथून माय लेक झाले होते बेपत्ता कुरणखेड येथील हृदयद्रावक घटना




भारतीय अलंकार न्यूज 24

अकोला: बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीत कुरणखेड  नदीच्या पात्रात एका मातेने आपल्या चिमुकल्या सह  नदीच्या पात्रात उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना  १ डिसेंबर शुक्रवारी सकाळी उघडकीस आली, या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. अश्विनी आष्टनकर वय ३३, शिवांश आष्टनकर वय ०६ असे मृतांची नावे आहेत.




सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीत  कुरणखेड चंडिका देवी मंदिरात एका चिमुकल्या सह एक महीला शुक्रवारी सकाळी आली होती.  दरम्यान तेथे आपल्या जवळची  बॅग ठेवून तेथुन ती महीला आपल्या चिमुकल्या सह कुरणखेड नदीच्या काठी गेली. त्या महिलेने ठेवलेली पिशवी घेण्यासाठी परतली नाही. सदर महिला कोण व ती बॅग मंदिर परिसरात ठेवून परतली नाही, याबाबतची माहिती मंदिरातील भाविकांनी बोरगाव मंजू पोलिसांना दिली. 



पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सदर घटनेची सत्यता शोध घेतला असता, चिमुकल्या सह मातेचा मृतदेह नदीच्या पात्रात आढळून आला. शोध कार्यात चंडिका माता आपत्कालीन पथकाचे रणजित घोगरे, योगेश विजयकर यांनी सहकार्य केले. 



पोलिसांनी घटनेचा व मृतदेहाचा पंचनामा केला असता, सदर महिले जवळ ओळख पत्र मिळाले. यावरून मृत महिला अश्विनी आष्टनकर वय ३३ , शिवांश आष्टनकर वय ०६  राहणार अष्ट भुजा चौक वर्धा असे निष्पन्न झाले.



या महिलेने चिमुकल्या सह आत्महत्या करुन  जीवनयात्रा संपवल्याचे टोकाचे पाऊल का उचलले. यामागील नेमके कारण काय, हे मात्र समजू शकले नाही. पुढील तपास ठाणेदार मनोज केदारे,  दुय्यम ठाणेदार पुरुषोत्तम ठाकरे, उपनिरीक्षक रत्नदीप पळसपगार, गणेश काळे,हेडकॉन्स्टेबल सतिष सपकाळ, गिरीश विर सह पोलीस करत आहेत.



पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा व मृतदेहाचा पंचनामा केला असता सदर महिलेने मृत्यूपुर्व चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्या चिठ्ठीत घटस्फोट घेतल्यानंतरही पती त्रास देत असून यामुळे आत्महत्या सारखे टोकाची भूमिका घेत असल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून सदर चिठ्ठी हस्तगत केली आहे. त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आह. तपासा अंती नेमका प्रकार उघडकीस येईल. 

टिप्पण्या