shiv sena akola gunthewari : शिवसेनाचे (ठाकरे गट) गुंठेवारी संदर्भात म.न.पा मध्ये धरणे आंदोलन




भारतीय अलंकार न्यूज 24

अकोला:शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा वतीने आज १ डिसेंबर रोजी दुपारी १२:३० महानगरपालिका मध्ये गुंठेवारी संदर्भात म.न.पा मध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.


१ ऑगस्ट २०२३ पासून प्रशासकीय ठराव घेवून १०% शुक्ल वाढ लागू केली आहे. गुंठेवारी ॲक्ट मध्ये अशाप्रकारे कुठेही प्रावधान नाही. त्यामध्ये ओपन स्पेस सोडणे हा विषय आहे. २० ते ३० वर्षे पासून ज्यांनी गुंठेवारी प्लॉट पाडले त्यांची आहे. गुंठेवारीचे शुक्ल न भरणे हि चूक मूळ जमीनधारकाची व ती वसूल न करणे ही जबाबदारी प्रशासनाची होती.




गुंठेवारी प्लॉट धारक हे सामान्य घोर गरीब नागरिक आहेत. १ वर्षा आधी ज्या प्लॉटला १० हजार रु. लागायचे त्याच प्लॉट धारकाच्या रोजची नागरिकाला १ लाख रु. लागत आहे. काहींचे तर प्लॉट जेवढ्यात घेतले आहे त्या पेक्षा खर्च त्यांना गुंठेवारी नियमाकुल करण्यास लागत आहे आणि हा तर सामान्य नागरिकावर पठाणी पध्दतीने वसुलीची आठवण करून देत आहे.


जर आपल्याला १०% शुक्ल वाढीव वसूल करायचे असेल तर मूळ जमीनधारकांचा शोध घेऊन त्यांचा कडून तो वसूल करण्यात यावा. या करिता गरीब गुंठेवारी धारकांना वेठीस धारकांच्या आपला हट्टहास गरीब जनतेचा आर्थिक कणा मोडणारा आहे.




व अकोला महानगर पालिका मध्ये अनेक जागा महानगरपालिका चे असून व महसूल विभागाचे असून २०१८ चे जी.आर प्रमाणे तिथले स्थानिक रहिवासी त्यांना ती जागा लीज पट्टावर देण्याचा आदेश असून तरी आता पर्यंत शहरामध्ये कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. याकरिता सर्व प्रथम शिवसेना यांच्या वतीने आवाज उठवून आपल्याला अवगत केले होते तरी पण आपण त्यावर कोणतेच ठोस निर्णय न घेता बघ्याची भूमिका पार पडत  आहे. करिता आम्ही आज आंदोलनाचा हा पवित्र घेत आहे.




यावेळी शिवसेना शहर पश्चिम प्रमुख राजेश मिश्रा पूर्व शहर प्रमुख राहुल कराळे,गजानन बोराळे, मंगेश काळे, पंकज जायले, गजानन चव्हाण,नितीन मिश्रा,संजय अग्रवाल,किरण ठाकरे, प्रकाश वानखडे, सतीश नगदीवे, जय इंगोले, अंकुश सीत्रे, अविनाश मोरे, निलेश वानखडे,रामेश्वर पळुडकर, श्याम रेळे, बाळू ढोले पाटील, मोंटू पंजाबी, रोशन राज,राजेश इंगळे, सुनील दुर्गया, सागर कुकडे, संतोष रणपिसे,अमर भगत, छोटू धुर्वे, रवी अवचार,गणेश पोलाखडे, विश्वास शिरशाट, संतोष टापरे, देवा गावंडे, गणेश बंदले,अमित भिरड,प्रशात तराळे, दादा राव, गणेश मालटे, प्रमोद धर्माळे, अमल्य पाटील, दीपक माटे, प्रणय बासोळे, रवी मडावी, चेतन मारवाल हे उपस्थित होते.



टिप्पण्या