Poor-work-of-akot-lohari-road: अकोट-लोहारी रस्त्याचे निकृष्ट काम;गावकऱ्यांचा अकोट तहसील कार्यालयात ठिय्या





भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: जिल्ह्यातील अकोट-लोहारी रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामा विरोधात गावकऱ्यांनी आज अकोट तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन केले. 




गावकऱ्यांनी यावेळी निकृष्ट दर्जाचं होत असलेल्या कामाचा पुरावा म्हणून बांधकाम केलेल्या रस्त्याचं डांबर आणि गिट्टी सोबत आणली होती. साडेपाच  किलोमीटरच्या रस्त्याला लाखोंचा निधी मंजुर झाला आहे,मात्र या कामात वापरण्यात येत असलेले समान साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला.






काळ्या गिट्टी ऐवजी मुरूम मिश्रीत गिट्टीचा वापर शिवाय वापरण्यात येत असलेले डांबराचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे सदरचे काम कमी कालावधीचे ठरणार आहे, असा ही आरोप यावेळी आंदोलकांनी केला. यामुळे नागरिक रस्त्यावर उतरले. 



अकोटच्या सार्वजनिक बांधकाम अभियंत्यांना याआधी सुद्धा अवगत केले होते. त्यानंतरही कामात सुधारणा न झाल्याने गावकऱ्यांनी रस्त्यावर ठिया आंदोलन करून ही बाब निदर्शनास आणून दिली होती.






या आंदोलनाची दखल घेत बांधकाम विभागाने सदर रस्त्याचे उत्कृष्ट काम तीन दिवसाने सुरू करण्याच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. दर्जेदार काम सुरू न झाल्यास गावकऱ्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी दिला.



टिप्पण्या