- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
political maharashtra : आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवावा - चंद्रशेखर बावनकुळे; दिशा सेलियन प्रकरणी दिला सल्ला
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
ॲड. नीलिमा शिंगणे जगड
अकोला : देवेंद्र फडणवीस आकसापोटी वागणार नाही तर देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवण्याचा सल्ला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिशा सेलियन प्रकरणी आदित्य ठाकरेंना दिला.
चंद्रशेखर बावनकुळे आज रविवारी एका कार्यक्रम निम्मित अकोल्यात आले होते. याप्रसंगी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला.
नुकत्याच पार पडलेल्या 5 राज्याच्या निवडणुकीत भाजपचा विजय झाला असून मुख्यमंत्री कोण असावं या संदर्भात आदित्य ठाकरेंनी आम्हाला सल्ला न देण्याचा ही बावनकुळे म्हणाले. तर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना लिहलेलं पत्र ट्विट केल्या प्रकरणी त्यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे. भाजपने फडवणीस यांचा याबाबत अभिनंदन केल्याचं ही ते म्हणाले.
छगन भुजबळ यांच्या वक्तव्यापासून सरकार अडचणीत येणार नसल्याचंही बावनकुळे म्हणाले. तर माध्यमांवर सतत चमकत राहण्यासाठी काही लोक काहीही विधान करत असतात म्हणत त्यांनी नाना पटोले यांना टोला लगावला. देवेंद्र फडणवीस यांना उठून कुणीही बोलेल त्यावर जनता विश्वास ठेवणार नाही असंही बावनकुळे म्हणाले.तर शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासाठी नितेश राणे बोलतील, अस वक्तव्य बावनकुळे यांनी करताच हास्याचे फवारे उडाले.
स्वर्गीय आमदार शर्मा यांच्या कुटुंबियांची घेतली भेट
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार गोवर्धन शर्मा 'लालाजी' यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या निवासस्थानी चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज रविवारी कुटुंबीयांची सांत्वन पर भेट घेतली. या निमित्ताने लालाजींच्या आठवणींना उजाळा दिला. लालाजींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
Aditya Thackeray
Chandrasekhar Bawankule
Devendra Fadnavis
Disha Selian case
political maharashtra
Rajkaran
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा