People Republican Party : पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्या मागणीला यश: धाबा मार्गे मांडोली पर्यंत झाला बस सेवेचा विस्तार; गावकऱ्यांनी केले चालक व वाहकाचे स्वागत



भारतीय अलंकार न्यूज 24

अकोला : धाबा मार्गे मांडोली पर्यंत बस सेवा सुरु करण्याची मागणी पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष नागसेन क्षिरसागर व बार्शीटाकळी तालुका अध्यक्ष नवलसिंग राठोड, जिल्हा उपाध्यक्ष अनिल गवई यांच्या समवेत कार्यकर्त्यांनी परिवहन विभागाचे विभाग नियंत्रक शुभांगी शिरसाट यांना ३० ऑगस्ट रोजी दिले होते. त्यानुसार विभाग नियंत्रक यांनी पुढील कार्यवाही करीत सदर संदर्भांकीत पत्र आगार व्यवस्थापक यांच्याकडे हस्तांतरीत केले होते. त्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करीत सर्व्हे करण्यात आला व सर्व्हेनुसार बसचा विस्तार मांडोलीपर्यंत दि. २९ नोव्हेंबर २०२३ पासून विस्तार करण्यात आला असून झालेल्या विस्तारामुळे गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पहिल्यास दिवशी बस मांडोलीमध्ये आल्यानंतर उत्साही गावकऱ्यांनी बसची पुजा करुन चालक व वाहकाचे शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. 





यावेळी गावकऱ्यांच्या वतीने बस विस्तारीकरणाकरिता लढा देणारे पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष नागसेन क्षिरसागर व बार्शीटाकळी तालुकाध्यक्ष नवलसिंग राठोड यांचे गावकऱ्यांचे वतीने आभार मानण्यात आले. यावेळी पांडुरंग जाधव, रमेश जाधव, दयाराम राठोड, देविदास राठोड, शाखा अध्यक्ष राजेश जाधव, सहदेव गायकवाड, सुनिल जाधव, सुनिल राठोड, अमोल राठोड,  महेश राठोड, संजय पवार, सुनिल मंजुळकर, राजु धोत्रे, श्रीराम झ्याटे, जनार्धन झ्याटे, संतोष जाधव, विनोद राठोड, विनोद जाधव, रवि जाधव, चंदन जाधव, राहुल जाधव, सुजीत चव्हाण, भास्कर शिंदे, हरिदास व्यवहारे, उमेश जाधव, गजानन डाखोरे, नितीश डाखोरे, दशरथ घाटे, ललीताबाई राठोड, पायल नवल राठोड, वनिता जाधव, यमुनाबाई राठोड आदींची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.

टिप्पण्या