- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
one-tune-one-beat-in-akola: शिक्षणमहर्षी डाॅ.भाऊसाहेब देशमुख यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त'एक सुर-एक ताल'; चार हजार विद्यार्थ्यांनी धरला एकाचवेळी ठेका
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
ॲड. नीलिमा शिंगणे जगड
अकोला: कृषिरत्न शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे जीवन शेतकरी व कष्टकरी वर्गासाठी समर्पित होते. त्यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षात एक सूर एक ताल कार्यक्रमाचे आयोजन करून, राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला आहे. भाऊसाहेबांच्या कार्याची माहिती अश्या कार्यक्रमाच्या माध्यमातून नव्या पिढीला सांगितली जात असल्याचे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले.
श्री शिवाजी शिक्षण संस्था व युवक बिरादरी मुंबईच्या संयुक्त विद्यमाने लाल बहादूर शास्त्री क्रीडांगण येथे आयोजित 'एक सुर-एक ताल' कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. गजानन पुंडकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. विधान परिषद सदस्य आमदार किरण सरनाईक आमदार धीरज लिंगाडे, दैनिक देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरे, श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे कार्यकारणी सदस्य सुरेश खोटरे, प्राचार्य केशव गावंडे ,स्विकृत सदस्य डॉ. अमोल महल्ले, डाॅ सुचेता पाटेकर, उपव्यवस्थापक पंडीत पंडागळे,शाळा तपासणी अधिकारी प्रकाश अंधारे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष व श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष एडवोकेट गजाननराव पुंडकर यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.कार्यक्रमाचे उद् घाटन डाॅ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डाॅ.शरद गडाख यांचे हस्ते दिपप्रज्वलनाने व डाॅ.पंजाबराव देशमुख यांच्या फोटोचे पुजनाने करण्यात आले. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे शाळा तपासणी अधिकारी प्रकाश अंधारे यांनी प्रास्ताविकातून 'एक सुर-एक ताल' कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विषद केली.
प्रकाश पोहरे यांनी याप्रसंगी एक सूर एक ताल कार्यक्रमाचे आयोजक,सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले .अशा प्रकारचे कार्यक्रम प्रत्येक शाळा महाविद्यालयातून गावागावात घेण्याचे आवाहन आपल्या भाषनातुन केले.
विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडुन वाहत आहे.भाऊसाहेबांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी व राष्ट्रीय एकात्मतेचे, मानवतेचे दर्शन घडविण्यासाठी या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षात संस्थेने भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केल्याचे प्रतिपादन ॲड. गजानन पुंडकर यांनी अध्यक्षीय भाषणातून केले.
माजी आमदार तुकाराम बिडकर,श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य महादेवराव भुईभार, दादाराव पाथ्रीकर, मधुकर पाटील, प्रा.पी.एस.वाटाणे, प्रा.खांडेकर, भरत लांडे, नानासाहेब देशमुख, प्रकाश गावंडे, प्राचार्य थोरात, प्राचार्य अंबादास कुलट , डाॅ.अविनाश बोर्डे, समन्वय समितीचे सचिव विजय ठोकळ यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. पाहुण्यांचे स्वागत समन्वय समितीचे सचिव विजय ठोकळ, सदस्य डाॅ.अविनाश बोर्डे, मनोज देशमुख, संजय वालशिंगे यांनी केले.
विविध भाषांमधील गीत
डाॅ. भाऊसाहेब देशमुख यांचे गौरवगीत 'हे लोक महर्षी युग पथदर्शी विजयी नाम अनोखा लो प्रणाम कोटी जनोका','इक बाग है ये दुनिया वो इश्वर माली है' ',पर्यावरण गीत हा नाश थांबवा भूमातेचे तन मन जळते आहे, ही वसुंधरा जनसंख्येच्या भाराने रडते आहे', गूजराती गीत-'अमे गीत गगन नां गाशु, अमे गीत गगन मा गाशु',पंजाबी गीत -'ढोलीया बे ढोलीया! ओ मेरे बेलिया, इक डगा ढोहल ते ढोहल ते लांदा जा ,मेरा सुतडा देश जगांदा जा' व 'सदाचार संकल्प संकल्पना दे जगी चांगले तेच आमच्या मना दे' बंगाली गीत- 'गीतभारो तेरी माटीर घोरे खेतेर आडे नोदीर तीरे बाजुक शुखेर बांशी'ही प्रेरणा गीते लय ताल सुरात सादर केली. कार्यक्रमाचे गीत संचालन राजेश उमाळे व नृत्य दिग्दर्शन शितल मेतकर यांनी केले.
या शाळांचा सहभाग
अकोला व वाशिम जिल्ह्यातील श्री शिवाजी विद्यालय मुख्य शाखा, श्री शिवाजी विद्यालय शहर शाखा श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कुटासा, श्री शिवाजी विद्यालय आसेगाव बाजार, तुकाराम इंगोले विद्यालय कानशिवनी, चव्हाण कन्या शाळा अकोट, शिवाजी उच्च माध्यमिक शाळा अकोट, श्री शिवाजी हायस्कूल गोरेगाव खुर्द, श्री शिवाजी हायस्कूल राजंदा,श्री शिवाजी विद्यालय वनोजा, श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय निंबा,श्री शिवाजी हायस्कुल किन्हीराजा या शाळांच्या सुमारे ४००० विद्यार्थ्यांनी 'एक सुर- एक ताल' कार्यक्रमात रंगत आणली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा