NMMS exam in Akola district: अकोला जिल्ह्यात 4574 विद्यार्थ्यांनी दिली एनएमएमएस परीक्षा

          





भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: इयत्ता आठवीच्या आर्थिक दुर्बल घटकातील ज्यांच्या पालकाचे उत्पन्न तीन लाख पन्नास हजार पेक्षा कमी आहे अशा प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे  त्यासाठी त्यांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने एनसीआरटी नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने तसेच शिक्षणाधिकारी माध्यमिक डॉक्टर सुचिता पाटेकर यांचे मार्गदर्शनात राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एन एम एम एस )घेण्यात आली. 




यावर्षी या परीक्षेचे आयोजन 19  केंद्रावर करण्यात आले. परीक्षेला अकोला जिल्ह्यातून 4574 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.      


     



यामध्ये अकोला शहरातील भारत विद्यालय (248), जागृती विद्यालय(243) ,न्यू इंग्लिश हायस्कूल (256), परशुराम नाईक विद्यालय बोरगाव मंजू (205), मांगीलाल शर्मा विद्यालय (264) , स्वावलंबी विद्यालय (150), तसेच श्री शिवाजी विद्यालय अकोट (277), सरस्वती विद्यालय अकोट (230), नरसींग विद्यालय अकोट (228), धनाबाई विद्यालय बाळापुर (210), बाबासाहेब धाबेकर विद्यालय बार्शी टाकळी (404), मुर्तीजापुर हायस्कूल मुर्तीजापुर ( 226), भारतीय ज्ञानपीठ मुर्तीजापुर (218) , श्री गाडगे महाराज विद्यालय मुर्तीजापुर (148), शिवशंकर विद्यालय उरळ (206) ,शहाबाबू उर्दू हायस्कूल पातुर (261), सेठ बन्सीधर विद्यालय तेल्हारा (454), सहदेवराव भोपळे विद्यालय हिवरखेड( 217) या 19 केंद्रावर एकूण 4574 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट होते.        



             



परीक्षेमध्ये पहिला पेपर बौद्धिक क्षमता चाचणी 90 गुणांचे 90 बहुपर्यायी प्रश्न दुसरा पेपर शालेय क्षमता चाचणी मध्ये इयत्ता सातवी व आठवीच्या अभ्यासक्रमावर आधारित सामान्य विज्ञान (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र ,जीवशास्त्र) समाजशास्त्र (इतिहास, नागरिकशास्त्र ,भूगोल) व गणित असे 90 गुणांचे 90 बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात आले होते. 





एन एम एम एस शिष्यवृत्तीधारकांची राज्यासाठी 11662 विद्यार्थ्यांचा कोटा आहे ,त्यापैकी अकोला जिल्ह्यासाठी 198 चा कोटा निश्चित करण्यात आलेला आहे. परीक्षेचा निकाल साधारणतः फेब्रुवारीच्या पहिला आठवड्यात किंवा दुसरा आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. शिष्यवृत्ती पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता नववी ते बारावी पर्यंत प्रति महिना 1000 रुपये प्रमाणे शिष्यवृत्ती दिली जाते. पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी इयत्ता नववी व दहावी मध्ये किमान 55 टक्के गुण आवश्यक आहेत. 





परीक्षा केंद्र संचालकाचे यशस्वी कार्य  मनीषा अभ्यंकर, सुवर्णा कोळंकर, भानुदास एन्नावार, हरीश शर्मा , संजय वालसिंगे,  भूषण ठाकूर, राजेश जोशी,  गंगाधर सोळंके, सय्यद नासिर सय्यद मीर, अनिल देविकर, अजय पवार,  विलास खाडे, बाळू पोहरे, संजीव वाहूरवाघ , गोपाल फाफट, संतोष राऊत, रश्मी ढेंगे, मुजीबुल्ला खान हबीब खान, माधव मुनशी यांनी यशस्वी काम पाहिले. तसेच सर्व केंद्रावर केंद्र निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले होते .परीक्षा केंद्राला शिक्षणाधिकारी माध्यमिक डॉक्टर सुचिता पाटेकर ,जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक प्रमोद टेकाडे,  गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती अकोला श्याम राऊत , विस्तार अधिकारी दीपमाला भटकर,समन्वयक डॉक्टर रवींद्र भास्कर यांनी भेटी दिल्या.                          

टिप्पण्या