mother and baby: ते 20 मिनटं ठरले आई अन बाळाला जिवनदान देणारे; जिवनरक्षक दीपक सदाफळे यांची कार्य तत्परता



भारतीय अलंकार न्यूज 24

अकोला: बाळाचे अर्धे डोकं बाहेर निघालेले व आईच्या प्रसुती कळा सुरू अश्या कठीण प्रसंगी 30 किलो मीटर प्रवास अवघ्या 20 मिनिटात पूर्ण करुन जीवरक्षक दीपक सदाफळे आई आणि बाळाचे प्राण वाचविले.



याबाबत सविस्तर वृत्त असे की, पिंजर येथील रऊफभाई बागवान यांची मुलगी प्रसुती करीता पिंजर येथे रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हा पासुन पोटात कळा चालु झाल्या. सकाळी बाळाचे डोके बाहेर निघालेले आणि आईचा बिपी वाढलेला. यामुळे तात्काळ प्रसुती तज्ञ डाॅ.लता लहाने यांनी पुढील उपचारासाठी अकोला जिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी सांगीतले. तेव्हा नातेवाईकांनी कारंजा येथे आमच्या करीता योग्य सुविधा असल्याने, कारंजा येथे घेऊन जाण्यासाठी दीपक सदाफळे यांना विनंती केली. दीपक सदाफळे यांचा रुग्णसेवेचा 25 वर्षाचा अनुभव आणी अशा इमर्जन्सी घटनांना हाताळण्या पद्धती येथुन यांचे बाळाचे अर्धे डोकं बाहेर निघालेले व आईच्या प्रसुती कळा सुरू होत्या. अश्या कठीण प्रसंगी कारंजा पोहचुन देण्यासाठी ते 20 मिनटाचे टार्गेट अन 30 की.मी. पुर्ण करत जिवनरक्षक दिपक सदाफळे यांनी पुर्ण केले. आणि आईसह बाळाला सुखरूप ठेवले. जिवनदान देणारे ते 20 मिनीट माय लेकासाठी अनमोल क्षण ठरले. 



कारंजा येथे हाॅस्पीटलला पोहचताच दोन मिनटात साधी प्रसुती झाली. आई व बाळ ठणठणीत असल्याचे डाॅक्टरांनी सांगताच सर्व नातेवाईकांचा आनंद गगनात मावेनासा झाला. यावेळी पिंजर येथील रऊफभाई बागवान रसवंतीवाले आणि लिंबू व्यापारी बब्बुभाई बागवान यांनी जिवरक्षक दीपक सदाफळे यांचे आभार मानले.

टिप्पण्या