linestaff-workers-mahavitaran: महावितरण कंपनीतील लाईनस्टाफ कामगारांचे 11 डिसेंबरला आजाद मैदानावर धरणा आंदोलन; राज्यभरातून 15 हजार कामगार सहभागी होणार




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची वारस कंपनी असलेली महावितरण कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या लाईनस्टाफ कामगारांच्या प्रलंबीत प्रश्नांसाठी महाराष्ट्र राज्य लाईनस्टाफ बचाव कृती समिती स्थापन करण्यात आली. कृति समितीच्या वतीने 11 डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर 11 डिसेंबर रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार असून, यामध्ये राज्यभरातून  जवळपास 15 हजार लाईनस्टाफ कामगार सहभागी होणार आहेत. या संदर्भात अकोला येथील विद्युत भवन समोर शनिवारी द्वार सभा घेण्यात आली. सभेला शेकडो कामगारांनी उपास्थित राहून आपल्या मागण्या रेटून धरल्या.


9 संघटनांच्या कृती समितीमध्ये महाराष्ट्र राज्य वीज तांत्रीक कामगार संघटना, वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंता सेना, बहूजन विद्युत अभियंता अधिकारी फोरम, म. रा. स्वतंत्र बहूजन वीज कर्मचारी संघटना, म. रा. स्वाभिमानी विद्युत वर्कर्स युनियन, इलेक्ट्रिसिटी लाईनस्टाफ असोशिएशन, म. रा. नवनिर्माण वीज कामगार सेना, तांत्रीक कामगार युनियन, क्रांतीकारी लाईनस्टाफ सेना, यासह लाईनस्टाफ अभ्यास गटाचे पदाधिकारी यांचा समावेश आहे. कृती समितीच्या वतीने कंपनी प्रशासनास लाईनस्टाफ कामगारांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांसाठी आंदोलन नोटीस दिली. या नोटीसवर संचालक यांच्या पातळीवर दोन वेळा आणि अध्यक्ष तथा एम.डी. यांच्या समवेत एक बैठक संपन्न झाली. अत्यंत सकारात्मक चर्चा करण्यात आली. कृती समितीस तब्बल दोन महिने झुलवत ठेऊन मान्य केलेले मुद्दे देखील परिपत्रक काढून मार्गी लावले नाहीत. यामुळे कामगारांमधील प्रचंड नाराजी व या नोटीसमधील जिव्हाळ्याचे प्रश्नांसाठी नोटीसमधील क्रमबध्द आंदोलनानुसार 11 डिसेंबर रोजी आजाद मैदान येथे धरणा आंदोलनाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती कृती समितीने दिली.






महावितरण कंपनीतील लाईनस्टाफ कामागारांचे प्रश्न


महावितरण कंपनीतील वर्ग ४ च्या लाईनस्टाफ कामगारांची एन्ट्री पोस्ट कायम ठेऊन शैक्षणिक अर्हता प्राप्त लाईनस्टाफ कामगारांना वर्ग 3 मध्ये वर्ग करण्यात यावे, या करिता म. रा. विद्युत मंडळ असतांना आस्तित्वात असलेले पदे कारागीर अ, ब, व क, मिटर टेस्टर ग्रेड 1/2/3 केबल जॉइंटर, तारमार्ग निरीक्षक, तारमार्ग बांधकाम कार्यदेशक, व इतर पदे पुन्हा बहाल करण्यात यावीत,


महावितरण कंपनीतील लाईनस्टाफ कर्मचारी यांचे कामाचे तास निश्चित करण्यात यावे, ग्रामिण भागातील लाईनस्टाफ कामगारांना रात्रपाळी भत्ता देण्यात यावा.




महावितरण कंपनीतील लाईनस्टाफ कामगार यांचे कामाचे कामाचे स्वरूप निश्चित करण्यता यावे.


महावितरण कंपनीतील तांत्रीक कामगारांना स्वतंत्र वेतन श्रेणी लागू करण्यात यावी.


पेट्रोल भत्त्यामध्ये वाढ करून दर महा किमान 20 लिटर किंवा सामान्य आदेश क्र. 89 / 90 प्रमाणे लागू करण्यात यावा.


वीज बिल वसुली हे काम सांघिक स्वरूपाचे असून त्याची जबाबदारी निश्चित करण्यात यावी, व लाईनस्टाफ कामगारांना रु.5000/- च्या आतिल थकबाकीदारांची यादी सोपविण्यात यावी.


सुरक्षा साधने व मेन्टनन्स करिता योग्य ते साहित्य पुरविण्यात यावे.




कंत्राटी कामगार न ठेवता सरळ सेवा भरती माध्यमातून नोकरभरती करण्यात यावी.


या  प्रश्नांसाठी कृती समितीच्या वतीने क्रमबध्द आंदोलन नोटीस देण्यात येऊन पहिल्या आणि दुसऱ्या टप्यात मंडळ आणि परिमंडळ कार्यालयासमोर व्दारसभांचे आयोजन, यानंतर कंपनीचे सिम कार्ड परत करणे, यानंतर वीज बिल वसुली बंद करणे, स्वतःचे वाहन वापरणे बंद करणे आणि यानंतर 11 डिसेंबर 2023 रोजी आजाद मैदान येथे प्रचंड धरणा आंदोलन याप्रमाणे आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यात आली आहे.



11 डिसेंबर रोजी मुंबई येथील आजाद मैदानावर राज्यभरातून 13 हजार लाईनस्टाफ कामगारांनी ऑनलाईन रजा टाकलेली असून लेखी रजा देणाऱ्या कामगारांची संख्या 3000 पर्यंत आहे, यामुळे या धरणा आंदोलनासाठी राज्यभरातून जवळपास 14 ते 15 हजार लाईनस्टाफ कामगारांची उपस्थिती राहील अशी माहिती कृती समितीच्या घटक संघटनांचे पदाधिकारी महाराष्ट्र राज्य वीज तांत्रीक कामगार संघटनेचे सरचिटणीस सय्यद जहिरोद्दीन, वीज कर्मचारी, अधि. अभियंता सेना चे प्रविण पाटील, बहुजन विद्युत अभियंता फोरमचे धर्मभूषण बागूल, म. रा.स्व. बहूजन वी.कर्म. संघटनाचे एस. के. लोखंडे, म. रा. स्वाभिमानी वर्कर्स युनियनचे पी.बी.उके, इलेक्ट्रिीसिटी लाइनस्टाफ असोशिएशनचे राजूअलीमौला मुल्ला, म. रा. नवनिर्माण कामगार सेनेचे श्रीकृष्ण खराटे, तांत्रीक कामगार युनियनचे प्रभाकर लहाने, क्रांतीकारी लाईनस्टाफ सेनेच ललित शेवाळे, आणि लाईनस्टाफ अभ्यास गटाचे सुभाष बाहे, आदिनाथ पवार, स्वप्नील सुर्यवंशी यांनी दिली आहे.



टिप्पण्या