Kabaddi tournament keliveli: कबड्डीच्या पंढरी रंगले सामने; केळीवेळीत अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन, दवबिंदू पडल्याने खेळण्यात अडथळा



नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : कबड्डीची पंढरी म्हणून ओळख असणाऱ्या अकोला जिल्ह्यातील केळीवेळी येथे हनुमान क्रीडा प्रसारक व बहुउद्देशीय मंडळाच्या वतीने अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेत देशभरातून मुली व मुलांचे एकूण 32 संघ सहभागी झाले आहेत. ग्रामीण भागात राहण्याकरिता हॉटेल,लॉजची व्यवस्था नसल्यामुळे आलेल्या पाहुण्यांची व्यवस्था गावातील मोठ्या घरातच करण्याची जुनी परंपरा या गावाची आहे. पुरुष गटातील विजय चमुला 1 लाख रोख रक्कम तर महिला विजेता चमूला 71 हजार रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे.


गुरूवार 14 डिसेंबर पासून सुरू झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामने 17 डिसेंबरला रंगणार आहे. केळीवेळी येथील अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर नाव गाजवलं असल्याने केळीवेळीला कबड्डीची पांढरी म्हंटल्या जाते. यंदाची ही अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा केळीवेळी कबड्डी लीग या नावाने आयोजित करण्यात आली आहे.



अखिल भारतीय खुल्या  कबड्डी स्पर्धेचे  उद्घाटन 



हनुमान क्रीडा प्रसारक व बहुउद्देशीय मंडळ केळीवेळीच्या वतीने डॉ राजकुमार बुले सन्मानार्थ स्वर्गीय रामकृष्ण आप्पा मिटकरी चषक अखिल भारतीय खुल्या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन गुरुवारी सायंकाळी झाले. यावेळी उद्घाटनीय सामने खेळविण्यात आले.  उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्योजक एकनाथ दुधे होते.  पुरुष गटाच्या सामन्याचे उद्घाटन पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे कुलसचिव सुधीर राठोड आणि महिलाच गटाच्या सामन्याचे उद्घाटन गोदावरी मिटकरी यांच्या हस्ते करण्यात आले.  प्रमुख अतिथी म्हणून हभप सोपान शेलार, डॉ श्रीकांत काळे ,कविता मिटकरी ,राष्ट्रीय कबड्डीपटू प्रविणा गोणे, दहीहंडा पोलीस स्टेशनचे एपीआय योगेश वाघमारे, नाजुकराव पखाले, प्रा. विवेक हिवरे, वासुदेव नेरकर , माजी पोलीस पाटील डॉ अशोक मोंढे , रामभाऊ अहिर , माजी आमदार गजानन दाळू गुरूजी,डॉ. राजकुमार बुले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.  कार्यक्रमाचे प्रस्ताविक माधव बकाल यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन अनिल गासे यांनी केले. यावेळी मान्यवरांचे समायोचित भाषणे झाली.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते क्रीडा स्पर्धा ध्वज फडकविण्यात आला. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. 



उद्घाटन सामने 



उद्घाटनीय सामना पुरुष गटात हनुमान क्रीडा मंडळ केळीवेळी विरुद्ध समता क्रीडा मंडळ नाशिक आणि महिला गटात अकोला जिल्हा संघ अकोला विरुद्ध एसएस अकॅडमी दिल्ली यांच्यात झाला. खेळाडूंचा प्रमुख पाहुण्यांनी परिचय करून घेतला. या स्पर्धा मॅटवर खेळविण्यात येत आहेत.  




अन खेळाडूंचे  मैदानात पाय घसरले



स्पर्धा उद्घाटन कार्यक्रमाला नियोजित वेळा पेक्षा अधिक उशीर झाल्यामुळे स्पर्धातील सामने खेळविण्यासही खूप उशीर झाला.  हिवाळ्याचे दिवस असल्याने मॅटवर दवबिंदू पडण्यास सुरूवात झाली. यामुळे खेळाडूंना खेळ खेळण्यास अडचण निर्माण होत होती. वारंवार मॅट वायपरने पुसण्यात येत होती. मात्र परत दवबिंदूमुळे मॅट ओली होत असल्याने खेळाडूंचे पाय खेळताना  घसरत होते. यामुळे पुढील सामना होऊ शकले नाहीत. केवळ उद्घटनिय प्रदर्शनी सामने काही वेळासाठी खेळविण्यात आले.




गणेश स्तवन 


याप्रसंगी श्री सखाराम महाराज विद्यालय केळीवेळीच्या विद्यार्थ्यांनी गीत सादर केले. चिमुकल्यांचे प्रमुख अतिथी आणि ग्रामस्थांनी कौतुक केले. यावेळी शिक्षिका ललिता भरणे, प्रिया बुले ,ज्योती उन्होने यांनी परिश्रम घेतले.या उद्घाटननिय कार्यक्रमाचे प्रास्ताविक हनुमान मंडळ अध्यक्ष माधव बकाल यांनी तर संचालन अनिल गासे यांनी केले




पंच मंडळी 

स्पर्धा निरीक्षक वासुदेव नेरकर, आंतरराष्ट्रीय पंच पद्माकर देशमुख ,पंच अधिकारी ऋषिकेश कोकाटे, राहुल यादव, प्रशांत रोडे ,रवी रोहन कार चरण शिरसाट विजय सोनकर हरीश हरणे राम नवघरे दिनेश चंदेल बिपिन हटकर वसंत उडाले देवी कांबळी महेंद्र डेंगे रवी नारनवरे नरेंद्र उमरेकर शैलेश देशमुख सय्यद मकसूद विकास नवघरे संजय खातोकार ,रवी राठोड सुरेश कालसर्पे ,सुधाकर कोहालकर गौरव धानोरकर वानखडे शुभम लुंगे शोभा सहारे हे काम पाहणार आहेत.





टिप्पण्या