health-patients-hospital-akola: रुग्णालयात रुग्णांच्या आरोग्याशी खेळ; रुग्णाच्या जेवणात निघाल्या अळ्या, मनसे सैनिकांनी घेतला आक्रमक पावित्रा





भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : रुग्णांना देण्यात येणाऱ्या जेवणात अळ्या आढळून आल्याने रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार अकोल्यातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात शुक्रवारी समोर आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला येथील रूग्णांचे जेवणची व्यवस्था श्री संत गजानन महाराज शेगांव या संस्थानला द्या,अशी मागणी या प्रकारानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष राजेश काळे यांनी केली.




शासकीय वैद्यकीय रुग्णालय अकोला दवाखाण्यात रुग्ण उकर्डा बळीराम मेहरे (रा. उगवा)  हे वार्ड क्रमांक 31 मध्ये उपचारार्थ भरती आहेत. शुक्रवार 29 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता ते जेवण घ्यायला गेले असता, या आहार मध्ये अळ्या व किडे दिसून आले.  या रुग्णाने संबंधितांकडे या आहार विषयी तक्रार केली असता, तेथील कर्मचा-यांनी ते जेवण फेकून दिले व रुग्णास दमदाटी करून हाकलून दिले. त्यानंतर या रुग्णाने आणि नातेवाईकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हाध्यक्ष यांच्याशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली.





या गंभीर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून हलगर्जी करणारे कर्मचा-यावर निलंबनाची कार्यवाही करावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा मनसे सैनिकांनी दिला आहे. 


यासंदर्भात मनसे सैनिकांनी रुग्णालय प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाशी संपर्क साधून या प्रकरणाची गार्भीयाने दखल घेवून दोषींना कडक शासन करावे, असे सांगितले. यावर अधिकारी वर्गाने दोषींवर निश्चितच कारवाई करू, असे आश्वासन दिले. 



शासकीय वैद्यकीय रूग्णालय अकोला येथे रुग्णांच्या जेवणाची व्यवस्था गजानन महाराज संस्थान शेगांव यांच्या कडे देण्यात यावी, अशी मागणी यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेश काळे, महिला जिल्हाध्यक्ष प्रशंसा  अंबेरे, नाना बोरकर, जिल्हाध्यक्ष विधी व न्याय शेखर पोटदुखे, प्रेम मगर, शब्बीरभाई मॅकनीक, पवन राऊतकर, रवि मानकर, सुभाष अंधारे, विभाग अध्यक्ष संजय दुधे या मनसे सैनिकांनी केली.




“रुग्णालयात उपचारार्थ भरती असलेल्या एका रुग्णाच्या जेवणात अळ्या निघाल्या आहेत. या रूग्णाने आहार विषयी तक्रार केली असता तेथील कर्मचा-यांनी ते जेवण फेकून दिले व रुग्णास दमदाटी करून हाकलून दिले. याविषयी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली. या गंभीर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून हलगर्जी करणाऱ्या कर्मचा-यावर निलंबनाची कार्यवाही करावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तिव्र आंदोलन या विषयावर छेडण्यात येईल असा इशारा दिला.”


राजेश काळे , 

मनसे अकोला जिल्हाध्यक्ष

टिप्पण्या