- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
अकोला : अकोला येथील कौटुंबिक न्यायालय इमारतीचा ‘कोनशिला समारंभ’ आज शनिवार, ९ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी ३.३० वाजता न्यायमूर्ती भूषण गवई, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
हा समारंभ न्यायमूर्ती रवींद्र घुगे, उच्च न्यायालय, मुंबई, न्यायमूर्ती नितीन सांबरे, उच्च न्यायालय, मुंबई, न्यायमूर्ती अनिल किलोर, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या उपस्थितीत आणि न्यायमूर्ती मुकुलीका जवळकर, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली तसेच न्यायमूर्ती संजय मेहरे, उच्च न्यायालय, मुंबई, न्यायमूर्ती यनशिवराज खोब्रागडे, उच्च न्यायालय, मुंबई, न्यायमूर्ती अभय वाघवासे, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या उपस्थितीत आणि अव्दैत क्षीरसागर प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, अकोला यांच्यासह बार कॉउन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य ॲड. मोतीसिंह मोहता, बार कॉउन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाचे माजी अध्यक्ष ॲड. बी.के. गांधी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडणार आहे.
उद्घाटन समारंभाचा कार्यक्रम कौटुंबिक न्यायालय इमारतीची प्रस्तावित जागा, जिल्हा व सत्र न्यायालयासमोर, स्टेशन रोड, अकोला येथे आयोजित केला आहे.
या समारंभात बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शुभदा ठाकरे न्यायाधीश, कौटुंबिक न्यायालय, अकोला व अकोला वकील संघाचे अध्यक्ष ॲड. प्रवीण तायडे, व वरिष्ठ सचिव अकोला वकील संघ ॲड. धीरज शुक्ला यांनी केले आहे.
कार्यक्रमाच्या यशस्विते करीता उपाध्यक्ष ॲड. देवाशीष काकड, महिला उपाध्यक्ष ॲड. अरुणा गुलहाने, वरिष्ठ सचिव ॲड. धीरज शुक्ला, सचिव ॲड. विनय यावलकर, सह सचिव ॲड. शिवम शर्मा, ॲड. राजेश देशमुख, ॲड. राजकुमार मंत्री, ॲड. सतीष भूतडा, ॲड. अनुप देशमुख, ॲड. निखिल देशमुख आदी प्रयत्न करत आहेत.
कोनशिला समारंभ
न्यायमूर्ती भूषण गवई
सर्वोच्च न्यायालय
Akola
building
Cornerstone ceremony
family court
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा