Cricket news: एमसीजी संघ बनला छत्रपती प्रीमिअर लीगचा विजेता : उमरी योद्धा संघाचे उपविजेता पद, लीगमध्ये 10 नामांकित संघांचा समावेश




ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: संगम, एकता, एआयसी क्रिकेट क्लबच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती प्रीमिअर लीग सिजन 2 चा एमसीजी संघ विजेतेपदाचा मानकरी ठरला आहे. तर उमरी योद्धा या संघाला उपविजेता पदावर समाधान मानावे लागले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजेता, उपविजेता संघाला सिपीएल -2 चषक, रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. 


संगम, एकता, एआयसी क्रिकेट क्लबच्यावतीने छत्रपती प्रीमिअर लीग सिजन 2 चे आयोजन संगम क्रिकेट क्लब मैदान मोठी उमरी येथे करण्यात आले होते. या लीगमध्ये एनबी स्टार, सुपर लॉयन्स, इलेव्हन स्टार, एमसीजी, कास्तकार इलेव्हन, उमरी योद्धा, दया इलेव्हन, गौरक्षण क्रिकेट संघ, अंबिका इलेव्हन, स्पार्टन असे 10 संघ सहभागी झाले होते. या संघादरम्यान लीगचे सामने खेळविण्यात आल्यानंतर एनबी स्टार विरुद्ध स्पार्टन, अंबिका इलेव्हन विरुद्ध जीसीसी, सुपर लॉयन्स विरुद्ध दया इलेव्हन, इलेव्हन स्टार विरुद्ध एमसीजी असे क्वार्टर फायनलचे सामने खेळविण्यात आले. यातून अंबिका विरुद्ध उमरी योद्धा व एनबी स्टार विरुद्ध एमसीजी असे सेमिफायनल खेळविण्यात आल्याने उमरी योद्धा व एमसीजी संघाने अंतिम फेरी गाठली. 



अंतिम सामन्यात एमसीजी संघाने उमरी योद्धा संघाचा पराभव करत सिपीएल-2 चषकावर आपले नाव कोरले. यावेळी ओबीसी नेते प्रा. डॉ. संतोष हुशे, जिप. गटनेता ज्ञानेश्वर सुलताने, सिव्हील लाईन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कार, ढवळे ऑटोझोनच्या संचालिका स्नेहल ढवळे, कपिल गवई, प्रवीण निळखन, लक्ष्मण निखाडे, मनीष टायटन्सचे संचालक मनीष लदनिया, दिलीप मसने, शॅडो स्पोर्ट्सचे संचालक निखिल तुरकाने, ओम पाटील, गोलू हातेकर, मनन शहा, चंद्रशेखर बाळापुरे, सामाजिक कार्यकर्ते सूरज कावळे, शिवाजी भोसले, कृष्णा मेतकर, प्रमोद डोईफोडे आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती. 



यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या, उपविजेता संघाला सिपीएल -2 चषक, रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेकरिता निखिल क्षीरसागर, विलास बंकावर, दीपक शुक्ला, पंकज शहाकार, सोनू वानखडे, देवराज देशमुख, प्रवीण अंभोरे, मयूर निकम, करण कावळे, श्रीनित पाटील, हरगोविंदसिंग रोहेल, मोहन मानेकर,   स्वप्नील गुप्ता, चंदू सिरसाट, वैभव सिरसाट, बादल सिरसाट, देविदास बानोकार, अरुण पेढेकर, प्रमोद मोरे, स्वप्नील महल्ले, हर्षल वाकोडे, वैभव कोतमिरे, गणेश जगधन, चेतन बुंदेले, श्रवण गायकवाड, सौरभ ठाकरे, सागर इंगळे, रोशन इंगळे, काल्लू तिवारी, शुभम इंगळे, सनी बनसोड, सोहन मेश्राम आदींनी पुढाकार घेतला.


यांनी पटकाविले पारितोषिके

छत्रपती प्रीमिअर लीगमध्ये वैभव वानखडे याला मिस्टर सिपीएल पुरस्कार, प्लेअर ऑफ द सिरीज शुभम दांदळे, सिपीएल बेस्ट बॅटर शेख उमर, बेस्ट बॉलर मनीष मनवाणी, इमर्जिंग प्लेअर यश बुंदेले, बेस्ट फिल्डर श्रीकांत पागृत, बेस्ट विकेटकीपर नंदकिशोर सुलताने, बेस्ट कॅच सौरभ शेगोकार, फेअर प्ले पुरस्कार टीम अंबिका यांनी पुरस्कार मिळविले. तसेच अंपायर दीपक फाले, राजेश दुधगम, समालोचक श्रीनित पाटील, ऋषी बांगर, गजानन भिसे, अधिराज देशमुख, केतन भोवते, सम्यक कांबळे आदींना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

टिप्पण्या