court news: ॲट्रॉसिटी, विनयभंग आणि पोक्सो आरोपातुन आरोपींची निर्दोष मुक्तता




भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: ‘आमची वहिनी’ असे म्हणत रस्त्याने जाणाऱ्या अल्पवयीन मुलीची ओढणी ओढत विनयभंग केला, असा आरोप असणाऱ्या आरोपींवरील दोष सिद्धता होवू न शकल्यामुळे न्यायालयाने सर्व आरोपींची ॲट्रॉसिटी, विनयभंग आणि पोक्सो आरोपातुन निर्दोष मुक्तता केली आहे.




हकीकत अशा प्रकारे आहे की,  ०६ ऑक्टोबर २०२२ रोजी तारफैल अकोला येथे राहणाऱ्या एका मुलीने तारफैल भागातच राहणारे शेख रहीम शेख गफुर व इतर दोन अज्ञान मुलां विरूध्द असा रिपोर्ट दिला होता की, ०५ ऑक्टोबर २०२२ रोजी रात्रीच्या ९.४५ वाजता ती तिच्या मैत्रिणीच्या घरून तिच्या घरी चालत जात असतांना शेख रहीम व इतर दोन अज्ञान मुलांनी त्यांच्या हातातील सिगरेटचा धुर तिच्या अंगावर उडविला होता. तिला आक्षेपार्ह व जातीवाचक शिवीगाळ केली होती.  तिला "आमची वहिनी" म्हणुन तिची ओढनी ओढुन एका अज्ञान मुलाने तिचा हात पकडला होता. जेव्हा पिडीता व तिचे आई वडील आरोपी शेख रहीम व अज्ञान मुलांच्या घरी गेले तेव्हा त्या लोकांनी त्यांना शिवीगाळ करून धमक्या दिल्या होत्या. अशा रिपोर्टवर पोलीस स्टेशन रामदासपेठ अकोला येथे भा दं वि. चे कलम २९४, ३५४, ३५४(अ), ३४ व पॉक्सोचे कलम ७, ८ व १२, तसेच एस.सी.एस.टी. (अट्रॉसिटी) ॲक्टचे कलम ३(१) (w) (i) (ii), ३(१) (r) (s), ३ (२) (va) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. 



या प्रकरणाचा तपास एस.डी.पी.ओ. सुभाष दुधगांवकर यानी करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. या प्रकरणामध्ये सरकार पक्षाने एकुण पाच साक्षीदार तपासले.  साक्षीदारांची आरोपीच्या वकीलांनी उलटतपासणी मध्ये तफावत व उणीवा विद्यमान न्यायालया समक्ष आणुन दिल्या व सरकार पक्ष आरोपी विरूध्द संशया पलीकडे दोष सिध्द करू शकले नाही, म्हणुन तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधिश सुनिल पाटील यांनी आरोपी शेख रहीम शेख गफुर याची निर्दोष मुक्तता केली. 



आरोपीच्या वतीने ॲड. अय्युब नवरंगाबादे, ॲड. अली रजा खान यांनी काम पाहिले व ॲड. अब्दुल शफीक यांनी सहकार्य केले.

टिप्पण्या