congress-party-political-news: फौजदारी विधिज्ञ विजय पाटील झटाले यांचा काँग्रेसमध्ये सक्रिय सहभाग





भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : येत्या 28 डिसेंबरला भारतीय राष्ट्रिय काँग्रेस पक्षाचा 138 वा स्थापना दिन साजरा होणार आहे.  या अनुषंगाने आज स्वराज्य भवन येथे काँगेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे माजी शिक्षणमंत्री व अकोला जिल्ह्याचे माजी पालकमंत्री वसंतराव पुरके यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. 



बैठकीत काँगेसचे वरिष्ठ नेते श्याम उमाळकर, विठ्ठल अंभोरे ,ॲड. नतिकुद्दीन खतीब, माजी राज्यमंत्री अजहर हुसेन, अशोक अमानकर,

प्रकाश तायडे, मदन भरगड, साजिद खान पठाण, प्रदिप वाखारिया महानगराध्यक्ष डॉ. प्रशांत वानखडे, चंद्रकांत सावजी, पुजा काळे, तश्वर पटेल, महेंद्र गवई, आकाश कवडे, पराग कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. 



यादरम्यान अकोल्यातील ख्यातनाम फौजदारी विधिज्ञ विजय पाटील झटाले यांचा काँग्रेस मध्ये सक्रिय सहभाग करून घेण्यात आला. ॲड. झटाले हे पूर्वीपासूनच काँग्रेसमध्ये सक्रिय राहिले आहेत. काँग्रेस सोबत त्यांची मजबूत नाळ जुळलेली आहे. परंतु काही काळ वकिली व्यवसायातील व्यस्ततेमुळे काँगेस मध्ये ते सक्रीय नव्हते. मात्र काँग्रेससोबत सदैव राहिले आहेत. काँग्रेसची विचारधारा जन माणसात रुजविण्यात ते नेहमीच अग्रेसर राहिले.



काँग्रेस वर्धापन दिन कार्यक्रम अनुषंगाने आज अकोल्यात राज्यातील  वरिष्ठ नेत्यांचे आगमन झाले होते. याप्रसंगी ॲड. विजय पाटील झटाले यांचा वरीष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत विशेष सत्कार घेवून सक्रिय सहभाग करुन घेण्यात आला.



आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष वरिष्ठ ॲड. झटाले यांच्यावर मोठी जबाबदारी  सोपविणार असल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत.

टिप्पण्या