christmas-2023-akola-city: ख्रिसमस सणा निम्मित अकोला बाजारपेठेत झगमगाट; सांताक्लाॅजचा लाल ड्रेस आणि टोपी खरेदीसाठी बच्चे कंपनी उत्सुक




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: ख्रिसमस सण काही तासांवर येवून ठेपला आहे. यानिमित्त ख्रिश्चन धर्मियांच्या घरी उत्साहात तयारी सुरू असून सणाच्या खास खरेदीसाठी बाजारपेठेकडे पावले वळली आहेत.  ख्रिसमस निम्मित गांधी रोड बाजारपेठेत झगमगाट दिसून येत आहे. 



रंगीबेरंगी दिवे,आकर्षक सजावटीचे साहित्य, ख्रिसमस ट्री, छोट्या रंगीत बल्बमाळा, एलईडी स्टार लाइट माळा, सांताक्लाॅजचे प्रतीक असलेल्या छोट्या बाहुल्या, जिंगल बेल्स, सांताची गाडी तर बच्चे कंपनी साठी सांताचा लाल ड्रेस मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तर महिलांसाठी दागिन्यांची आणि युवक युवतींसाठी रेडिमेड पार्टीवेअर आणि फॅशनेबल कपड्यांची रेलचेल बाजारात दिसून येत आहे. तसेच विविध प्रकारचे केक, चॉकलेट, मिठाई, गिफ्ट आर्टिकल बाजारात उपलब्ध आहेत.





शहरातील सर्व चर्च परिसरात सजावटीची लगबग सुरू असून रंगीबेरंगी विद्युत रोषणाईने चर्च उजळून निघाले आहेत. चर्चच्या आतही अतीशय सुंदर पद्धतीने सजावट करण्यात येत आहे. 


असे आहेत साहित्य दर 



ख्रिसमस ट्री १ फूट : १५० ते २५०, ख्रिसमस ट्री ३ फूट : ३५० रूपये,
ख्रिसमस ट्री ४ फूट : ४५० ते ५०० रुपये, सॉक्स गिफ्ट बॅग ६० ते २५०,
टोपी : ३५ रूपये, रिंग : १०० ते ४००, स्टार कंदील : १५० ते ५५०
स्टार लाईट माळ:  २५० ते ७५०
साधे तोरण:  १८० ते ३५०
स्टिकर्स : ५० ते २००




टिप्पण्या