BJP: चार राज्यातील निवडणुकात भाजपाने तीन राज्यात मिळविला मोठा विजय; अकोला शहर व पातूर येथे विजयोत्सव साजरा



भारतीय अलंकार न्यूज 24

अकोला: आगामी लोकसभा निवडणुकीवर प्रभाव पाडू शकतील अशा चार राज्यातील निवडणुकात भाजपाने तीन राज्यात मोठा विजय मिळविला आहे. या विजयाचा येथे अकोला भाजपा कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांनी आनंद साजरा केला.




भारतीय जनता पक्षातर्फे भाजपा कार्यालय ते जयप्रकाश नारायण चौक पर्यंत मिरवणूक काढून ढोल ताशे वाजवित, मिठाई वाटप करून आतिषबाजी करीत या विजयाचा जल्लोष करण्यात आला. या प्रसंगी भाजपाच्या महिलांनी रांगोळी काढून तसेच फुगडी खेळून आनंद साजरा केला.


याप्रसंगी आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल ,किशोर मांगटे पाटील, विजय अग्रवाल, अर्चना मसने, गिरीश जोशी यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा व मित्र पक्ष 400 पेक्षा अधिक जागा मिळविणार असल्याचे याप्रसंगी बोलताना आमदार रणधीर सावरकर म्हणाले, तर भाजपाचा हा भव्य विजय भाजपा विरोधकांना चपराक देणारा असल्याचे आमदार वसंत खंडेलवाल यांनी सांगितले. रविवार 3 डिसेंबर रोजी जस जसे त्या चार राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल घोषित होवू लागले व त्यात भाजपाचा विजय होत असल्याचे पाहिल्यावर येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात महिला आघाडी, युवा मोर्चा, दलित आघाडी ,आदिवासी आघाडी, शेतकरी आघाडी व विविध क्षेत्रातील कार्यकर्ते यांनी एकत्र येवून हा जल्लोष साजरा केला. भारतीय जनता पक्ष कार्यालयात सकाळपासून गर्दी केली होती.



पातुर भाजपच्या वतीने विजय उत्सव


पातूर : मध्य प्रदेश छत्तीसगड राजस्थान तीन राज्यात भाजपानें विधानसभा निवडणूकीत विजय मिळवीला असून,मतदारांनी भाजपाच्या बाजूने कौल दिल्याने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या निवडणूक निकालांवरून भारतातील जनतेचा विश्वास केवळ सुशासन आणि विकासाच्या राजकारणावर असल्याचे दिसून येत आहे. जनतेचा विश्वास भाजपावर आहे.याच विजय उत्सव विजयाचा आनंद जल्लोष करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे पातूर तालुका व शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पातूर येथील जुने बस स्थानक चौक येथे मोठया प्रमाणात आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला. यावेळी नागरिकांना पेढे वाटण्यात आले. कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरविले. यावेळी भिकाभाऊ धोत्रे, रमण जैन, विजयसिंह गहलोत,प्रेमानंद श्रीरामे, पुंडलिक आखरे, चंद्रकांत अंधारे, बालू बगाडे, राजू उगले, अभिजीत गहलोत, ॲड. रुपाली राऊत, वैशाली निकम, तुळसाबाई गाडगे,वर्षा बगाडे, प्रिया कोथळकर, शीलाताई आवटे, गजानन शेंडे, विनोद लोथे, मंगेश केकण, सचिन ढोणे, सचिन बायस, सचिन बारोकार, गणेश गाडगे, प्रवीण इंगळे,बाळू वळतकर, राजाराम देवकर, विठ्ठल लोथे, अंकुश राठोड, संदीप तायडे, किरण निमकंडे, मुकेश शर्मा, बंडू बडकर, रमेश भालतिलक, नितीन इंगळे, राहुल भगत,मनवर खा, शशिकांत भरकर,मंगेश देवकर,निलेश फुलारी, मुकेश फुलारी, प्रदीप फुलारी, नितीन फुलारी, सचिन शेवलकार, विठ्ठल काळे, नवीन करंगळे,बाळू गोतरकर,दिलीप डोंगे, महिंद्र ढोणे, रवी फलके, रुपेश फलके,नीरज कुटे, दिगंबर उमाळे व मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.



 




टिप्पण्या