Akot - Lohare -Shirsoli road : अकोट - लोहारे सिरसोली रस्त्याच काम दर्जाहीन; युवकांनी दिला रस्त्यावरच ठिय्या




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: जिल्ह्यातील अकोट - लोहारे शिरसोली रस्त्याच काम दर्जाहीन होत असल्याचा आरोप करीत येथील ग्रामस्थांनी हा काम बंद पडला आहे. याआधी सुद्धा निकृष्ट दर्जाचं काम होत असल्याने हा काम बंद पाडण्यात आला होता. मात्र पुन्हा त्याच प्रकारे काम सुरू केल्याने संतापलेल्या गावातील युवकांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन करत दर्जेदार कामाची मागणी केली आहे.

जोपर्यंत दर्जेदार मटेरियल वापरणार नाही तोपर्यंत काम होऊ देणार नाही असा पवित्रा यावेळी ग्रामस्थांनी घेतला आहे.




हा तर भष्ट वृत्तीचा कळस - राम म्हैसने 



अकोट लोहारे शिरसोली रस्त्याचे सुरू असलेले काम दर्जाहीन आहे, म्हणून तीन दिवसापूर्वी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राम म्हैसने यांनी या रस्त्यावरच जन आंदोलन केले. अखेर गिट्टी मिश्रित आच्छादलेले मुरमाड गोटे मटेरियल काढून टाकण्यात आले.  मात्र पुन्हा मुरमाड गोटे टाकून सुरू असलेले निकृष्ट काम पाहताच राम म्हैसने यांनी संतापून रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केले. पाचवर धारण बसलेल्या ठेकेदाराने व देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्याने पोलिसांना पाचारण करून राम म्हैसने यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. मात्र दर्जाहीन काम होऊच देणार नाही,असा पवित्रा राम म्हैसने यांनी घेतल्यावर अखेर ठेकेदार व अधिकाऱ्यास नमते घेऊन काम बंद करावे लागले. 



जोपर्यंत दर्जेदार मटेरियल वापरणार नाही तोपर्यंत काम होऊ देणार नाही, असा निर्धार राम म्हैसने यांनी केला आहे.

टिप्पण्या