akola-family-court-building: कौटुंबिक न्यायालयात संवेदनशील राहून काम करावं लागतं- न्यायमूर्ती भूषण गवई ; अकोला कौटुंबिक न्यायालय इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण





भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : इतर न्यायालयाच्या तुलनेत कौटुंबिक न्यायालयात संवेदनशील राहून काम करावं लागतं. अस मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी मांडले.


अकोला येथील कौटुंबिक न्यायालय इमारतीचा कोनशिला अनावरण श्री. गवई यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. शनिवारी अकोला जिल्हा व सत्र न्यायालय समोरील कौटुंबिक न्यायालयासाठी निश्चित केलेल्या जागेवर कोनशिला अनावरण कार्यक्रम पार पडला.




याप्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमू्ती रवींद्र घुगे, न्यायमूर्ती  नितीन सांबरे,न्यायमूर्ती अनिल किलोर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. पालक न्यायमूर्ती मुकुलिका जवळकर  अध्यक्षस्थानी होत्या. न्यायमूर्ती संजय मेहरे, न्या. यनशिवराज खोब्रागडे,न्या. अभय वाघवासे, प्र. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अद्वैत क्षीरसागर,  न्यायाधीश शुभदा ठाकरे, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. प्रवीण तायडे, विधिज्ञ ॲड.मोतीसिंग मोहता उपस्थित होते.



 

कौटुंबीक न्यायालयांच्या माध्यमातुन आपसातील मतभेद दूर करीत एकोपा निर्माण करीत न्यायदानाचे काम होईल असा आशावाद यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी व्यक्त केला. तर चांगला न्यायदानाचा कार्य या इमारतीतून होईल अशी अपेक्षा न्या . गवई यांनी व्यक्त केली.


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामान्य माणसाला न्याय मिळवून देणारी जगात आदर्श अशी राज्यघटना निर्माण केली.  न्यायदानाच्या प्रक्रियेत राज्यघटना केंद्रस्थानी असावी असे मत  भूषण गवई यांनी व्यक्त केले.


देशाची राज्यघटना न्याय,स्वतंत्रता, एकात्मतेवर आधारलेली असून ती डोळ्यासमोर ठेवून, तसेच सर्वांसाठी न्याय हे ब्रीद घेऊन न्यायदानाचे कार्य करणे अभिप्रेत आहे.  व्यक्तींतील मतभेद दूर करीत एकोपा निर्माण करीत न्यायदानाचे काम कौटुंबिक न्यायालयाच्या माध्यमातून व्हावे,  असेही न्या. गवई यांनी सांगितले. 



यावेळी न्यायालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राचे व भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचे अनावरण  मान्यवरांच्या  हस्ते  करण्यात आले. 






न्या. शुभदा ठाकरे यांनी प्रास्ताविक केले. ॲड. देवशिष काकड यांनी आभार मानले. कार्यक्रमाला न्यायाधीश वर्ग, न्यायालयीन अधिकारी व कर्मचारी व अकोला बार असोसीएशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.




टिप्पण्या