akola crime: मलकापूर वासियांचा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडकला आक्रोश मोर्चा; हल्लेखोरांवर एक्ट्रॉसिटी गुन्हे दाखल करण्याची मागणी



ठळक मुद्दे 

रस्त्यावर केक कापून वाढदिवस साजरा करण्याच्या वादातून युवकांवर प्राणघातक हल्ला; मलकापुरात राडा, पाच जखमी, खासगी रुग्णालयात उपचार सुरू,आज निघाला आक्रोश मोर्चा 






भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : अकोल्यातील मलकापूर भागात काल रात्री केक कापण्याच्या कारणावरून दोन गटात तुफान राडा झाला होता. मलकापूर भागातील मुख्य रस्त्यावर काही युवकांनी केक कापण्यासाठी चौकात गर्दी केली होती. चौकात केक कापू नका असा आग्रह येथील स्थानिक नागरिकांनी केला. त्यानंतर वाढदिवस साजरा करणाऱ्या आणि स्थानिकांमध्ये शाब्दिक वाद उमळला वादाचस्वरूप हाणामारीत झाला.या हाणामारीत 5 जण जखमी झाले तर यामधील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. प्राणघातक हल्ला करणाऱ्यांवर एक्ट्रॉसिटी गुन्हे दाखल करून त्वरित अटक करण्याच्या मागणीसाठी मलकापूर वासीयांनी पोलीस अधीक्षक कार्यालयावर हजारोंच्या संख्येने आक्रोश मोर्चा काढला होता. पोलिसांनी या प्रकरणी एक आरोपीला ताब्यात घेतलं असून पुढील तपास करीत आहे. अकोला शहरात रात्री बारा वाजता किंवा भर रस्त्यात केक कापून वाढदिवस साजरा करण्याची नवीन प्रथा सुरू झाली आहे. आणि त्यामुळेच असे वाद निर्माण होत आहेय अकोला पोलिसांनी अशा गोष्टींना आळा घालण्याची मागणी आता होत आहे.



खदान पोलीस ठाण्यांतर्गत मलकापूर येथे रविवार रात्री साडे आठ वाजताच्या दरम्यान वाढदिवसाचा केक कापण्यावरून वाद होवून मारहाण झाल्याची घटना घडली. यामध्ये पाच  जखमी झाले. यामधील एका युवकावर आरोपींनी चाकूने प्राणघातक हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले.  जखमी तरुणाला सर्वोपचार रुग्णालयात येथे दाखल करण्यात आले.  घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक धनजय सायरे सहकाऱ्यासह घटनास्थळी पोहोचले होते.



 

शुभम शांताराम वानखडे 28, अमित सुनील गोपनारायण 29, राजू प्रभाकर गोपनारायण 36, पवन मोहन गोपनारायण 27, हीरा कांबळे, सर्व रा. मलकापूर अशी जखमींची नावे आहेत.  



याप्रकरणी खदान पोलिसांनी एका युवकाला ताब्यात घेतले असून, इतरांचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. 

टिप्पण्या