- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
state level rope competition: राज्यस्तरीय रस्सीखेच स्पर्धेत नागपूर जिल्ह्याला 2 सुवर्ण, 2 रौप्य, 1 कांस्य पदक
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
सतीश भालेराव
नागपूर: पालघर जिल्हा टग ऑफ वॉर असोसिएशनच्या सहकार्याने व महाराष्ट्र टग ऑफ वॉर असोसिएशनच्या अधीपत्याखाली 24 वी सब जुनिअर, जुनिअर, सिनिअर मिश्र गट व सिनिअर पुरुष व महिला बीच राज्यस्तरीय रस्सीखेच स्पर्धा चिंचणी बीच जिल्हा पालघर येथे नुकत्याच संपन्न झाल्या. या स्पर्धेत नागपूर जिल्हा संघाने 2 सुवर्णासह 2 रौप्य व 1 कांस्य पदक प्राप्त केले.
सब जुनिअर मिश्र गटात 440 किलो वजन गटात ऊपांत्य फेरीत ठाणे संघाला 2-0 ने नमवून अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला मात्र अंतिम सामन्यात लातूर संघाकडून 0-2 पराभव स्वीकारून रौप्य पदक प्राप्त केले.
रौप्य पदक प्राप्त केलेला नागपूर जिल्हा संघ
1. अक्षद वि लोखंडे
2. नमन सु गोमकाळे
3. तन्मय मि पखीडे
4. सानिध्य स बागडे
5. चेतन श्री डोंगरे
6. शंतनू नि पाटील
7. आयन रा सरोदे
8. कलश दि घेडेस्वार
9. भूषण वि झाडे
10. दिव्यांशु सं धोंगे
प्रशिक्षक -खुशाल महादेव इंगोले
सब जुनिअर मिश्र गट 440 किलो वजन गट आतील संघाने हार्ड लाईन सामन्यात जळगाव संघावर 2-0 ने विजय मिळवून कांस्य पदक प्राप्त केले.
कांस्य पदक प्राप्त केलेला नागपूर जिल्हा संघ
1. नेहा मुरमारे
2. मुस्कान गंगभोज
3. नंदिनी लोखंडे
4.मानवी भेलावे
5.श्लोक काकडे
6.कुशल आवळे
7.सार्थीक उईके
8.हिमांशू मेंघरे
9. ख़ुशी शेळके
10.नैतिक मेंघरे
प्रशिक्षक-धैर्यशील नारायणराव सुटे
सिनियर पुरुष 580 किलो गट आतील संघाने उपांत्य सामन्यात नांदेड जिल्हा संघाला 2-0 ने नमवून अंतिम फेरी गाठली, व अंतिम सामन्यात मुंबई संघाकडून 0-2 ने पराभव पत्करून रौप्य पदक प्राप्त केले.
रौप्य पदक प्राप्त केलेला सिनिअर पुरुष नागपूर जिल्हा संघ
1.पियुष गजानन भोकरे
2.अर्जुन रणजित वानखेडे
3. हर्षल रामेश्वर माहुले
4.रुपेश दिनेश भुरसे
5. अनिकेत रुपेश कापसे
6. समीर सलीम शेख
7. प्रथमेश जयराम हेलोंडे
8. अजिंक्य गंगाधर ब्रह्म्हे
प्रशिक्षक - शुभम गजानन भोकरे
सब जुनिअर मुले 480किलो वजन गट आतील नागपूर जिल्हा संघाने ऊपांत्य फेरीत अहमदनगर संघावर 2-0 विजय मिळवून,अंतिम सामन्यात ठाणे जिल्हा संघावर 2-0 दणदणीत विजय मिळवून सुवर्णं पदक प्राप्त केले.
सुवर्णं पदक प्राप्त केलेला नागपूर जिल्हा संघ
1.कुशल आवळे
2.सार्थिक उईके
3. श्लोक काकडे
4. निरंजन बिनझाडे
5. स्वरित गौरखेडे
6. नैतिक गौरखेडे
7.प्रियांशु मोकारकर
8. अभय बंदेवार
9.नैतिक मेंघरे
10.प्रणय मानकर
प्रशिक्षक -शुभम गजानन भोकरे
सिनियर महिला 480 किलो वजन गट आतील नागपूर जिल्हा संघाने उपांत्य फेरीत नांदेड जिल्हा संघाला 2-0 ने नमवून अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला, व अंतिम सामन्यात मुंबई सिटी संघावर 2-0 ने दणदणीत विजय मिळवून ऐतिहासिक व प्रथम च नागपूर जिल्हा संघाकरीता सिनियर महिला संघाने सुवर्ण पदक प्राप्त करून दिले.
सुवर्णं पदक प्राप्त केलेला नागपूर जिल्हा महिला संघ
1. पलक माहुरे
2. अंशू बोरकर
3. निश्रुती गोरले
4. ख़ुशी चौरे
5. वैष्णवी वारकर
6. गोपिका दिवाण
7. मुस्कान शिवारे
8.अंजली झडाने
9.मीनाक्षी डफ्रे
10. पारुल वानखेडे
प्रशिक्षक -धैर्यशील नारायणराव सुटे
सर्व प्राविण्य प्राप्त खेळाडूंचे महाराष्ट्र टग ऑफ वॉर असोसिएशनच्या अध्यक्षा माधवी पाटील , सचिव जनार्धन गुपिले, दि टग ऑफ वॉर असोसिएशन नागपूरचे अध्यक्ष आ.सुनील केदार,सचिव धैर्यशील सुटे, कोषाध्यक्ष बबलू सोनटक्के, सहसचिव आशिष उपासे, राजकुमार परिहार, प्रभाकर क्षिरसागर, शुभम भोकरे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा