Popular MLA Govardhan Sharma passed away: लोकप्रिय आमदार गोवर्धन शर्मा यांचे निधन





भारतीय अलंकार 24

अकोला : अकोलेकरांच्या सुखदुःखात सहभागी होणारे व सदैव मदतीचा हात देणारे अकोला पश्चिमचे लोकप्रिय आमदार गोवर्धन शर्मा यांचे आज सायंकाळी  8 वाजताच्या सुमारास  निधन झाले. 



सामाजिक क्षेत्रामध्ये सातत्याने कार्यरत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राम भक्त, पक्षाविषयी असलेले एकनिष्ठ लोकनेते पश्चिम विदर्भात भारतीय जनता पक्षाला वाढवणारे व लोकप्रतिनिधी घडवणारे गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर, प्रमिलाताई टोपले वसंतराव देशमुख, संजय धोत्रे यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती.



संकट समयी धावणे, पूर असो दंगा असो लोकांच्या सोबत खंबीर उभे राहिले. 



श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्या माध्यमातून सातत्याने लोकांना मदतीचा हात देणारे पश्चिम विदर्भातील एकमेव नेते होते. त्यांच्या निधनाने भारतीय जनता पक्षाची फार मोठी हानी झाली आहे. 



उद्या अन्नपूर्णा माता मंदिराजवळ त्यांच्या अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या मागे दोन पुत्र एक  मुलगी, पत्नी गंगा देवी शर्मा असा आप्त परिवार आहे.




रामदेव बाबा शामराव मंदिर ट्रस्टी,   सालासर हनुमान मंदिर ट्रस्टी, ब्राह्मण समाजाला एकत्रित करण्याचे काम सर्व बहुभाषिके ब्राह्मण समाज परशुराम जयंती, वेगवेगळे कार्यक्रम सामुहिक विवाह परिचय संमेलन, मारवाडी संस्कृत विद्यालय संचालक होते.


धार्मिक सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये सातत्याने पुढाकार घेऊन आरोग्य क्षेत्रामध्ये अनेक शिबिर घेऊन नागरिकांच्या अनेक समस्या निराकरणासाठी कटिबद्ध असणारे सदैव 24 तास उपलब्ध राहणारे लोकनेते म्हणून लोकिक होता.


मोबाईल कधीच बंद न ठेवणारे ,हजारो नंबर लोक पाठवणारे मोबाईल नंबर व टेलीफोन नंबर आठवण ठेवणारे व कार्यकर्त्यांची ओळख ठेवणारे लग्न सुखदुःखात सहभागी होण्याची त्यांची किमया विठ्ठल मंदिराच्या माध्यमातून धार्मिक क्षेत्रामध्ये काम करणारे तसेच अयोध्या येथील तिन्ही कार सेवेमध्ये सहभागी होणारे शीला पूजन 1985 पासून श्री राम जन्मभूमी आंदोलनात सक्रिय सहभाग असणारे लोकनेते म्हणून लाख राम भक्त म्हणून ते प्रसिद्ध आहेत. अविकसित भागाचा विकास करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे शासन दरबारी प्रयत्नशील राहणारे जातपात धर्माला न मानणारे हिंदू समाजाचे नेते त्यांचा लौकिक होता.



लोकनेते व सुखदुःखात सहभागी होणारे धर्म आणि सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत राजकीय क्षेत्रामध्ये अजात शत्रू म्हणून ओळखले जाणारे आमदार गोवर्धन शर्मा यांचे  4 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता त्यांच्या निवासस्थानी आलसी प्लॉट इथून अंतिम यात्रा निघणार असून आळशी प्लाट खंडेलवाल भवन अशोक वाटिका मदनलाल दिग्रस चौक जयप्रकाश नारायण चौक गांधी चौक मार्गे भाजपा कार्यालयासमोर अंतिम दर्शनासाठी कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नागरिकांच्या साठी व्यवस्था करण्यात येणार आहे तसेच इथून यात्रा सिटी कोतवाली महाराणा प्रताप चौक जय हिंद चौक मार्गे विठ्ठल मंदिर श्रीवास्तव चौक दाबकी रोड मार्गे मांगीलाल शर्मा विद्यालय मैदान अन्नपूर्णा माता मंदिर येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. 



एक जानेवारी 1949 रोजी पुसद येथे त्यांचा जन्म झाला प्राथमिक शिक्षण पुसद इथे महाविद्यालय शिक्षण सरस्वती विद्यालय सध्याची खंडेलवाल विद्यालय कॉलेज शिक्षण एल आर टी कॉलेज मध्ये झाले असून कबड्डीपटू तसेच कुस्ती खेळाडू म्हणून त्यांची ओळख होती अजात शत्रू म्हणून सातत्याने कार्यरत होते नगरपालिकेमध्ये दोनदा प्रचंड बहुमताने निवडून आले नगरसेवक कसा असावा याचा आदर्श त्यांनी निर्माण केला . नगरपालिकेत पाणीपुरवठा सभापती , नियोजन विकास सभापती विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम पाहिले आलसी प्लांटमध्ये राहून जुन्या शहरात निवडून आले. 95 रोजी निवडणुकीमध्ये त्यांनी विजय प्राप्त करून सातत्याने सहा वेळा विधानसभेमध्ये प्रचंड बहुमताने निवडून आले. 



1995 मध्ये मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना दुग्ध मंत्री म्हणून त्यांनी काम केलं प्रमोद महाजन आणि नितीन गडकरी गोपीनाथ मुंडे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती म्हणून ते ओळखले जातात पक्ष पक्षासाठी सातत्याने 24 तास उपलब्ध राहणारे नेतृत्व तसेच अकोल्यात राष्ट्रीय अधिवेशन मध्ये कोषाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहायला तसेच अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी यांना निधी संकलन मध्ये सुद्धा कोषाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहायला भारतीय जनता पक्षाचे कोषाध्यक्ष महानगर अध्यक्ष प्रदेश कार्यकारणी सदस्य म्हणून त्यांनी काम केलं बहुभाषिके ब्राह्मण यांना एकत्रित करण्याचे काम सातत्याने केलं.



1985 ते 1992 पर्यंत राम जन्मभूमी आंदोलनामध्ये सातत्याने सक्रिय सहभाग घेतला कार सेवक म्हणून त्यांना झाशी इथे  अटक पंधरा दिवस अटक करण्यात आली. न्यू क्लॉथ मार्केट अध्यक्ष अकोला अर्बन बँक चे संचालक मांगीलालजी शर्मा महाविद्यालयाची स्थापना प्राथमिक शिक्षणापासून तर उच्च शिक्षणाची सोय असणाऱ्या शिक्षण संस्था उभी केली तसेच राजस्थानी मारवाडी ब्राह्मण संस्कृत विद्यालय चे संचालक राधाकिसन तोष्णीवाल आयुर्वेदिक महाविद्यालयाचे संचालक खंडेलवाल विद्यालयाचे संचालक श्री रामनवमी शोभायात्रा समितीचे सर्व सेवा अधिकारी म्हणून विठ्ठल मंदिर सर्व सेवा अधिकारी म्हणून तसेच अकोला शहरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये सर्व सेवा अधिकारी म्हणून सुधांशू महाराजांचे महाराजांचे चार वेळा यशस्वी कार्यक्रम, बहुभाषिकीय ब्राह्मणांना एकत्रित करण्याचे काम त्यांची व श्रीराम शोभायात्रा ठिकठिकाणी काढण्यासाठी प्रवृत्त करणे वनी अचलपूर परतवाडा मेहकर अकोला पुसद येथे दंगलग्रस्तांना मदतीचा हात, अनेक नागरिकांना 80 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना परिवारांना मदत ६२३२ कॅन्सल पिढी त्यांना मदत तसेच वेगवेगळ्या आजारांना मदत श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने त्यांना मदत अग्निकांमध्ये असलेल्या मदतीचा हात जवळपास 25 ठिकाणी मदतीचा हात 1000 पेक्षा परिवारांना रोजगार, 74 वर्षीय आमदार शर्मा सातत्याने सकाळी प्रभात फेरीच्या माध्यमातून कार्यरत शिवभक्त राम भक्त म्हणून तसेच श्रीराम सालासर सालासर बालाजी श्री रामदेव बाबा श्याम बाबा मंदिराचे ट्रस्टी म्हणून त्यांनी कार्य केले आहे कार्य केले आहे. त्यांच्या निधनाने पक्षाची हानी झाली आहे अनेक नागरिकांना मदतीचा हात देणारे कार्यकर्त्यांना घडवणारे कार्यकर्त्यांना मोठा करणारे असे नेतृत्व आमदार शर्मा सातत्याने विजयश्री प्राप्त करणारे व्यक्तिमत्त्व होते.

चाळीस वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केलं पक्षाचा आदेश सातत्याने पूर्ण करणारे पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात हजर राहणारे पक्षाचा आदेश अंतिम मानणारे व पक्षाशी एकनिष्ठ राहणारे सैनिक म्हणून त्यांचा लौकिक होता पक्षाचा त्यांच्यावर विश्वास असल्यामुळे व अकोले करांचा विश्वास असल्यामुळे विकासासाठी सदैव तत्पर राहणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती श्रीराम नवमी शोभायात्राच्या माध्यमातून वेगवेगळे धार्मिक सामाजिक आर्थिक कार्यक्रम आयोजन करून राष्ट्रभक्तीचे त्याची जागृती केली पाकिस्तान सैनिकांनी भारतीय सैनिकांची हत्या केल्यावर त्यांच्या निवासस्थानी बिहार येथे जाऊन मध्य प्रदेश बिहार छत्तीसगड तसेच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन त्यांना मदतीचा हात ओरिसा गुजरात बिल्लारी इथे मदतीचा हात देण्यात ते पुढाकार होते व्यापारी संघटनेची विदर्भ चेंबर ऑफ यांचा संबंध होता.



  

मान्यवरांनी व्यक्त केल्या संवेदना 


राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्यातील प्रदेशाध्यक्ष व नितीन गडकरी हे सुद्धा उपस्थित राहण्याची शक्यता असून, अकोला अकोला बुलढाणा अमरावती यवतमाळ वाशिम नागपूर नांदेड हिंगोली इथून मोठ्या संख्येने कार्यकर्ते व हितचिंतक त्यांच्या अंतिम यात्रा मध्ये प्रचंड जनसमुदाय उपस्थित राहणाऱ्या राहणार आहे. खासदार संजय धोत्रे यांनी त्यांच्या निधनाने आपण एक सच्चा मित्र सोबती व सदैव दुःख सुखात सहभागी होणारा सकारात्मक बाबीचा विचार करून पक्षासाठी अहोरात्र करणारा लोकनेता गेल्यामुळे फार मोठे हानी झाली. अशा शब्दात खासदार संजय धोत्रे यांनी आपली श्रद्धांजली अर्पण केली ‌ तर भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी आपले पिता तुल्य व आपल्याला घडवणारे तसेच सतत मार्गदर्शन करणारे सामाजिक क्षेत्रामध्ये धार्मिक क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये व आर्थिक क्षेत्रामध्ये काम करून प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होण्याची  किमया करणारा लोकनेता ज्येष्ठ मार्गदर्शक कार्यकर्त्यांचा आधार आमच्या मधून निघून गेला, अशा शब्दात त्यांनी आपली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.  

आमदार वसंत खंडेलवाल यांनी सदैव सकारात्मक बाबीचा विचार करून धार्मिक सामाजिक आर्थिक क्षेत्रामध्ये सदैव मार्गदर्शक नेतृत्व  यांच्या निधनाने फार मोठी हानी झाली अशा शब्दात त्यांनी आपली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.  

आमदार हरीश पिंपळे यांनी सुद्धा सातत्याने मार्गदर्शक व  पक्षाच्या ध्येय धोरणानुसार कार्यकर्त्यांच्या मदतीला धावणारे लोकनेते मार्गदर्शक व अकोला नव्हे तर विदर्भातील भाजप कार्यकर्त्यांची फार मोठी हानी झाली व हिंदू समाजाची फार मोठी हानी झाली अशा शब्दात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. 

विजय अग्रवाल यांनी सातत्याने मदत करणारे मार्गदर्शक व व पक्षाच्या विस्तारासाठी समाजातील सर्व घटकांना एकत्रित करण्याचे काम करणारे नेतृत्व गेल्यामुळे न भरून निघणारी हानी झाली अशा शब्दात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. 

आमदार प्रकाश भारसाकले, यांनी सातत्याने हिंदुत्वाचा विचार प्रचार प्रसार करणारे व जातपात- धर्मापेक्षा मानवता धर्म पालन करणारे लोकनेते आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनाने एक ज्येष्ठ सहकारी मार्गदर्शक आपण गमावला अशा शब्दात आपली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. 

समाजाला अभिप्रेत कार्य तसेच न्यू क्लॉथ मार्केट सोबत पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहणारे व धर्म आणि सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे मार्गदर्शक व आपल्या सोबत सोबत असणाऱ्यांना मोठे करणारे लोकनेते गोवर्धन शर्मा यांच्या निधनाने आपण पिता तुल्य व आपण मार्गदर्शक हरवलं  अशा शब्दात भाजपा जिल्हा ग्रामीण अध्यक्ष किशोर मागटे पाटील, यांनी आपली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. 


तेजराव थोरात तसेच आमदार संजय कुटे, आमदार आकाश फुंडकर आमदार प्रवीण पोटे आमदार राजेंद्र पाटणी, लखन मलिक आमदार प्रताप अडसड , आमदार मदनराव येरावर, जगदीश गुप्ता नरेंद्र गोलेचछा, यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

 



 



 


       


     

     


     

टिप्पण्या