political-maharashtra-sangli: नरेंद्र मोदी हा लोकशाहीचा नाही, तर ठोकशाहीचा पंतप्रधान - ॲड. प्रकाश आंबेडकर



सांगलीतील सत्ता संपादन निर्धार सभेत केले वक्तव्य 




भारतीय अलंकार न्यूज 24

सांगली : नरेंद्र मोदी हा लोकशाहीचा नाही तर, ठोकशाहीचा पंतप्रधान आहे. लोकसभेच्या निवडणुका होईपर्यंत तो एकही पत्रकार परिषद घेणार नाही, त्याला माहीत आहे सभेत आपण फेकू शकतो. पत्रकारांना समोर जाऊन उत्तर द्यायला मोदी घाबरतो. मोदी पत्रकाराला घाबरतो कारण पत्रकार याच्यापेक्षा हुशार आहेत, असा हा भित्रा पंतप्रधान आहे. याची नावालाच फक्त 56 इंच छाती आहे. असे म्हणत पंतप्रधान मोदींवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी कडाडून हल्लाबोल केला आहे.


वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सांगली येथे आज सत्ता संपादन निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष, ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले. या सभेत त्यांनी आरएसएस आणि भाजप यांच्यावर प्रखर टीका केली आहे. 






आरएसएस भाजपच्या दहा वर्षातील सत्तेचा हिशोब मांडायची सुरुवात केली पाहिजे. या देशात टोमॅटोचा तुटवडा करून, ३५ हजार कोटींची लूट केली आहे. यावर भाजप - आरएसएसशी चर्चा करायला आम्ही तयार आहोत. हे लुटारुंचं सरकार आहे, यांना आता मार्गी लावून टाका. पुन्हा यांना सत्तेवर आणण्याची गरज नाही. असे त्यांनी यावेळी म्हटले आहे.




पाच वर्षात निवडणुका होतात सरकार बदलतं. आतापर्यंत आम्ही निवडणुकीच्या माध्यमातून सत्तेत यायचा कधी प्रयत्न केला नाही पण यावेळी आम्ही सत्तेत आल्याशिवाय राहणार नाही. असा जाहीर निर्धार ॲड. आंबेडकरांनी या सभेत केला.




मागच्या दहा वर्षात हजारोंच्यावरती आपले सैनिक शहीद झाले आहेत. कारगिलच्या युद्धात सुद्धा एवढे सैनिक शहीद झाले नव्हते. १९५० ते २०१४ या कालावधीत भारताचे नागरिकत्व सोडून परदेशी नागरिकत्व घेणारे ७,६४४ हिंदू कुटुंबे आहेत. २०१४ ते २०२३ या कालावधीत ज्यांची मालमत्ता किमान ५० लाख आहे, अशा १४ लाख कुटुंबांनी भारताचे नागरिकत्व सोडून परदेशी नागरिकत्व स्वीकारलं. देशातून परदेशात जाऊन तेथील नागरिकत्व स्वीकारणाऱ्या गंभीर बाबीवर त्यांनी लक्ष वेधले आहे.


या मूर्ख सरकारच्या नादी आम्हाला लागायचं नाहीये, आमच्या बापजाद्याची इभ्रत वाचवायची आहे, म्हणून आम्ही नागरिकत्व सोडलं, असे परदेशी गेलेले भारतीय म्हणत असतात. या १४ लाख लोकांवर गुमनाम जगण्याची वेळ या भाजपने आणलीय. असे त्यांनी सांगितले.




यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते इम्तियाज नदाफ, राज्य उपाध्यक्ष दिशा पिंकी शेख, राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे, संतोष सूर्यवंशी, आदी मान्यवर उपस्थित होते.



टिप्पण्या