political-maharashtra-akola: नीलम गोऱ्हे यांनी राजकारण आणि समाजकारण बद्दल बोलू नये - सुषमा अंधारे





भारतीय अलंकार न्यूज 24

अकोला : नीलम गोऱ्हे यांनी नैतिकता गमावली असून, त्यांनी राजकारण आणि समाजकारण बद्दल बोलू नये, असा टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) उपनेता प्रा. सुषमा अंधारेंनी लगावला.




अकोल्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. पीडित बालिकेच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी प्रा .अंधारे सोमवारी सायंकाळी अकोल्यात आल्या होत्या. यावेळी प्रसार माध्यमांशी त्या बोलत होत्या.




अकोल्यात एका 14 वर्षीय मुलीवर अत्याचार झाला. या अमानुष कृत्या मुळे जिल्हा हादरून गेला आहे. या घटनेच्या अनुषंगाने सुषमा अंधारे यांनी गेल्या 6 महिन्यात अकोल्यात महिला व बालिकांवर झालेल्या अत्याचाराचा पाढाच वाचला.




सुषमा अंधारे यांनी भाजप आणि भाजप नेत्यांवर देखील जोरदार टीका केली. तर महिलांच्या सुरक्षितेच्या मुद्यावरून त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले.



महिला व बालकांवर अत्याचार होवू नये यासाठी सरकारने ठोस उपाययोजना कराव्यात, असा सल्ला सुध्दा त्यांनी दिला.यावेळी त्यांनी प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं आहे.






दरम्यान सुषमा अंधारे यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांसोबत विविध विषयावर संवाद साधला. त्यानंतर पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ताची बैठक घेवून चर्चा केली. तसेच मार्गदर्शन केले. यावेळी आमदार नितीन देशमुख, गोपाल दातकर, राजेश मिश्रा, अतुल पवनीकर, गजानन बोराळे, सुरेंद्र विसपुते, गजानन चव्हाण आदींसह शेकडो कार्यकर्ते हजर होते.



टिप्पण्या