farmers-swatantra-bharat-party: स्वतंत्र भारत पक्षाशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नाही- अनिल धनवट



भारतीय अलंकार न्यूज 24

अकोला:  राज्यात सध्या सरकारची फार विचित्र परिस्थिती झाली आहे. त्यामुळे स्वतंत्र भारत पक्षाशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नाही, असे मत सर्वोच्च न्यायालयाच्या त्रीसदस्य शेतकरी मसुदा समितीचे सदस्य व स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष अनिल धनवट यांनी दिली. ते अकोल्यात शासकीय विश्रामगृह येथे आज शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.


महाराष्ट्र शासन हिवाळी अधिवेशना कृषी निविष्ठा उत्पादक व विक्रेत्यांबाबत नवीन कायदे मांडणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. सदर कायदे शेतकरी हिताचे असून ते व्हावेत, असे मत धनवट यांनी मांडले. मात्र, यातील शिक्षेची जी तरतूद आहे ती झोपडपट्टी गुंड, वाळू तस्कर याप्रमाणे आहे ती वगळण्यात यावी याला समर्थन नाही. तसेच सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांचा देखील या कायद्यांमध्ये समावेश करावा, असे धनवट म्हणाले.



बोगस बियाणे व औषधी विकणाऱ्यांकडून नुकसान भरपाई व्हावी. त्यामुळे शिक्षेची तरतूद वाढवलेली आहे, असे देखील धनवट म्हणाले.



पत्रकार परिषदेला शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित बहाळे, महिला जिल्हाध्यक्ष सीमा नरोडे, सुरेश जोगळे, सतिष देशमुख, शेतकरी संघटनेचे सोशल मीडिया राज्यप्रमुख विलास ताथोड, जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील नाकट, विनोद मोहोकार, धनंजय मिश्रा आदी उपस्थित होते.




नवीन प्रस्तावित कायद्यांमध्ये निर्मात्यापासून ते किरकोळ विक्रेत्यांवर झोपडपट्टी गुंड, वाळू तस्कर याप्रमाणे कृषिगुंड म्हणून कारवाईची तरतूद आहे.ही बाब कायद्यात वगळून त्याऐवजी दंडात्मक कारवाई वाढवावी व कायदा आणखी कठोर करावा असे मत यावेळी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित बहाळे यांनी मांडले.

टिप्पण्या