court news: सामुहिक बलात्काराच्या गुन्ह्यातून आरोपींची निर्दोष सुटका




भारतीय अलंकार 24

अकोला: महिला पिडीतेच्या तक्रारी वरून पोलीस स्टेशन एम.आय.डी.सी. येथे वर्ष २०१९ मध्ये पोलिसांनी एका प्रकरणात एकूण सात आरोपींविरुद्ध कलम ३७६ (ड) भा. द. वी. प्रमाणे सामुहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. तपास पूर्ण करून पोलिसांनी सदर खटल्यात अकोला जिल्हा न्यायालयमध्ये दोषारोप पत्र दाखल केले होते.


त्या अनुषंगाने आरोपींविरुद्ध विद्यमान अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश, अकोला यांच्या न्यायालयात सत्र खटला क्र. १४२/२०१९ चालविण्यात आला. सदरहू खटल्या दरम्यान सरकारी पक्षाने एकूण आठ साक्षीदार तपासले. सदरहू साक्षीदार यांच्या उलट तपासामध्ये आरोपीविरुद्ध असलेला आरोप सिद्ध न होऊ शकल्या कारणाने विद्यमान अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश, अकोला यांनी दिनांक ०४.११.२०२३ रोजी आरोपींची निर्दोष मुक्तता केली.


सदरहू खटल्यामध्ये आरोपीतर्फे ॲड. आशिष देशमुख, ॲड.राकेश पाली, ॲड. आम्रपाली गोपनारायण (भावे), ॲड. आनंद साबळे, ॲड. नागसेन तायडे यांनी आरोपींची बाजू मांडून कामकाज पाहिले.

टिप्पण्या