akola wine bar association: अतिरिक्त ५% व्हॅट वाढीच्या निषेधार्थ वाईन बार असोसिएशनचा निघाला मोर्चा





भारतीय अलंकार न्यूज 24

अकोला: अतिरिक्त ५% व्हॅट वाढीच्या निषेधार्थ मोर्चाचे अकोला जिल्हा वाईन बार असोसिएशनने आज गुरुवारी जिलाधिकारी कार्यालयवर मोर्चा काढला. मोर्चा अशोक वाटिका येथुन दुपारी १२ वाजताच्या सुमारास निघून  सरळ जिल्हाधिकारी कार्यालय येथे धडकला. 





यावेळी अकोला जिल्हा वाईन बार असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या कडे मागणीचे निवेदन पाठविण्यात आले. शासनाने परमिटरूम वर केलेल्या ५% मुल्यवर्धित कर वाढ  परत घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.




शासनाने १ नोव्हेंबर पासुन परमिटरूम वर ५% मुल्यवर्धित करा मध्ये वाढ केलेली आहे. यामुळे परमिटरूमचा व्यवसाय संकटात आलेला आहे. परमिटरूमला होलसेल विक्रेत्यांकडुन येणाऱ्या मालावर ७ ते ७.५०% मार्जिन देण्यात येत आहे. असे असतांना शासनाने १०% कर लावणे परमिटरूम धारकावर अन्याय आहे. कारण या कर वाढी मुळे परमिटरूम व शॉपवर मिळणारा मालाच्या किमती मध्ये प्रचंड तफावत निर्माण होईल.


त्यामुळे परमिटरूम मध्ये येणारा ग्राहक आपोआप शॉप कडे जाईल त्यामुळे परमिट रुमच्या विक्रीमध्ये घट होऊन शासनाचा महसूल बुडण्याची भिती आहे. कारण शॉप वर व्हॅट टॅक्स नसल्याने तेथून माल घेऊन धाब्यावर किवा बाहेर बसुन दारु पिणे बरेच स्वस्त होईल. त्या कारणाने ग्राहक वर्ग तिकडे वळेल. त्यामुळे व्यवसायामध्ये कायद्याने शासनाची फि तसेच सर्व टॅक्स भरुन व्यवसाय करणाऱ्या परवाना धारका पेक्षा अवैध धंदे करणाऱ्या लोकांना फायदा होईल. तसेच अवैध धंदे फोफावतील. त्यामुळे शासनाचे टॅक्स  चे नुकसान होण्याची शक्यता आहे, असे निवेदनात म्हंटले आहे. 

असोसिएशन शासनाच्या महसुल वाढीच्या विरोधात नाही . मात्र  शासनाने हा कर उत्पादन स्त्रोतवर लावावा, अशी मागणी असल्याचे निषेधकर्त्यानी म्हंटले आहे.





अकोला जिल्हा बाईन बार व बिअर बार असोसिएशनच्या वतीने निषेध म्हणुन आज १६ नोव्हेंबर रोजी एक दिवस बंद पाळण्यात आला. 


बार असोसिएशनचे अध्यक्ष अतुल  पवनीकर,असोसिएशनचे मार्गदर्शक संतोष अग्रवाल,  श्रीकांत देशमुख यांनी vat व बार मालकावर होणाऱ्या त्रासा बाबत चर्चा व मार्गदर्शन केले. सचिव  राजेश गोसावी उपाध्यक्ष गजानन तायडे, दिलीप म्हसने, बबलू ठाकूर, मार्गदर्शक काशिसेठ बहल, राजुभाऊ सहगल, मुरलीसेठ लुल्ला,चंद्रकांत पाटील, कोषाध्यक्ष मनीष लुल्ला,गुड्डू चोपडे, अवी रामीधामी,भुषण इंगळे, राजु पावसाळे, संदीप मेंगे,पुरुषोत्तम पाटील, निलेश संघवी यांच्या सह अकोला शहरातील सर्व बार मालक व तालुक्यातील ,आकोट, तेल्हारा, बाळापूर, पातूर, मूर्तिजापूर, बार्शीटाकली, अकोला ग्रामीण तालुक्यातील बार मालकानी यांनी निषेध व्यक्त केला. 



शासनाने वाढवलेल्या पाच टक्के मूल्यवर्धित करा बाबत ७ नोव्हेंबर रोजी असोसिएशन एका बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली होती. 



या विषयावर चर्चा झाल्यानंतर सर्वानुमते असे ठरले होते की, शासनाला दिलेल्या पत्रानुसार जर मागणी मान्य झाली नाही तर दिनांक १६.११.२३ रोजी एक दिवस बार बंद ठेवून झालेल्या निर्णयाचा निषेध करण्यात यावा. या निर्णयानुसार  जिल्ह्यातील सर्व बारमालकांनी आज  अकोला येथे आपल्या कर्मचाऱ्यासह उपस्थित राहून मोर्चात सहभागी होवून निषेध व्यक्त केला.तसेच बंद यशस्वी केला, असे यावेळी अध्यक्ष अतुल पवनीकर व  सचिव राजेश गोसावी यांनी सांगितले.



टिप्पण्या