- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
अकोला: शहरातील अकोट फाईल पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या साधना चौकात आज दुपारी भावाने आपल्या काकाशी संगनमत करुन बहिणीची हत्या केल्याचे उघडकीस आले. या प्रकरणाला विवाह बाह्य संबंधाची किनार असल्याचे समोर येत आहे. हत्या उघडकीस येवू नये यासाठी मारेकऱ्यानी मुलीने आत्महत्या केल्याचा बनाव केला होता. मात्र पोलीसांनी घटना स्थळची पाहणी केली असता ही आत्महत्या नसून हत्याच झाली असल्याचा कयास लावला.
साधना चौकात राहणाऱ्या आरोपीची बहिण ही गेल्या काही दिवसांपुर्वी एका इसमासोबत पळून गेली होती. त्यामुळे मुलीने समाजात इज्जत घालवली असल्याचा राग मनात ठेवून आरोपी भाऊ व काका यांनी संगनमत करुन मुलीचा घात केला. मृतक मुलगी ही विवाहित असून तिला दोन लहान मुले आहेत.
मारेकऱ्यांनी मुलीने आत्महत्या केल्याचा बनाव केला. परंतू पोलिसांच्या तपासात आत्महत्या नसून हत्याच असल्याचे उघड झाल्याने तो बनाव फसला आहे. या प्रकरणी अकोट फाईल पोलीसांनी मृतक मुलीचा भाऊ व काका यांना हत्येच्या गुन्ह्यात ताब्यात घेतले आहे.
मूळ भुसावळ येथे राहणाऱ्या मृतक विवाहित मुलीची हत्या झाल्याची घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनतर लगेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष दुधगावकर यांच्यासह इतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले.
मृतक विवाहिता दोन मुलांची आई असुन ती काहीं दिवसांपूर्वी एका इसमा सोबत पळून गेली होती. याबाबत सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. यानंतर मुलीला अकोटफाईल पोलीस ठाण्यात आणून कुटुंबीयांनी तिची सुटका केली होती.
याप्रकरणी घटना स्थळी असलेले पुरावे व परिस्थिती पाहता मृतक विवाहित मुलीची हत्या झाल्याचा संशय स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला होता. त्यामुळें काका आणि भावाने मुलीच्या हत्येचा कट आखला आणि त्याला आत्महत्या म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी पोलिसांनी तपासाअंती संध्याकाळी संशयित आरोपी काका मुश्ताक आणि भाऊ इम्रान यांना ताब्यात घेवून कसून चौकशी करीत आहे.
घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेमुळे मृतक महिलेची तीन वर्षांची मुलगी आणि दीड वर्षाचा मुलगा पोरके झाले आहेत. या प्रकरणी अकोटफाईल पोलीस अधिक तपास करत आहेत.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा