- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार 24
अकोला: जिल्ह्यातील राजकीय पटलावरील एक खंबीर नेतृत्व व स्पष्ट वक्ते असलेले माळी समाजातील ज्येष्ठ नेते सूर्यभांनजी ढोमणे यांचे शुक्रवार 20-10-2023 रोजी सायंकाळी दीर्घ आजाराने निधन झाले.
त्यांची अंत्य यात्रा उद्या शनिवार 21 रोजी सकाळी 11 वाजता, त्यांचे राहते घर हिराबाई प्लॉट आदर्श कॉलनी, अकोला येथून निघणार आहे. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, सुन, मुली, नातू असा परिवार आहे.
सूर्यभान ढोमणे यांची अकोला जिल्ह्यात राजकीय पटलावर वेगळी ओळख होती. त्यांनी सुरुवातीला त्यांच्या मुळगावातून बार्शीटाकळी तालुक्यातील आळंदा रुस्तमाबाद येथून राजकारणाला सुरुवात केली. सुरुवातीला काँग्रेसमध्ये आणि नंतर अकोला जिल्ह्यात तत्कालीन भारिप बहुजन महासंघाचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर आणि माजी मंत्री मखराम पवार यांचे सोबत खांद्याला खांदा लावून काम केले. तळागाळात पक्ष पोहचविण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले. बहुजन समाज भारिप सोबत जुळविण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांचे बक्षीस म्हणून 1995 मध्ये बाळापुर विधानसभा मतदारसंघातून त्यांना भारिप बहुजन महासंघाची उमेदवारी दिली होती, ते अगदी थोड्या मताच्या फरकाने पराभूत झाले.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा