- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ठळक मुद्दे
*धम्म मेळाव्याच्या मंचावर ॲड. Balasaheb Ambedkar यांचे आगमन होताच जनतेने मोबाईल फ्लॅश लावून केले जल्लोषात स्वागत.
*ज्यांना-ज्यांना चौकशीला बोलावलं आहे. त्या सर्वांना मोदी - शहाने असं सांगितल आहे की, तुरुंगात जायच आहे की रस्त्यावर फिरायचयं!
*सामान्य जनतेने १० हजाराची चोरी केली, तर तुरुंगात पण, ७० हजार कोटीची चोरी करणारा तुरुंगा बाहेर!
*महाराष्ट्राला वैचारिक , राजकिय, सामाजिक न्यायाची वाट दाखवणारी भव्य धम्म सभा अकोल्यात प्रचंड गर्दीत संपन्न झाली!
तर मोदी भस्म होईल
*तुमच्या मतामध्ये जो मंत्र आहे,
तो मतपेटीत गेला तर मोदी भस्म होईल.
*निवडून दिलेल्या प्रतिनिधीला आपण सांगाल की, माझा विश्वास जोपर्यंत तुमच्यावर आहे, तोपर्यंत तुम्ही सत्तेवर आहात. ज्या दिवशी विश्वास नाही, तेव्हा तुम्हाला खाली खेचू तेव्हा तो प्रतिनिधी इमानदारीने काम करेल.
राजकीय बळाचे दर्शन
*धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने अकोला शहरातून भारतीय बौद्ध महासंघ व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीतून बहुजन समाजातील परंपरा, संस्कृतीसोबतच लोकसभा निडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचितच्या राजकीय बळाचेही दर्शन घडले.
या टोपी खाली दडलय काय!
*मिरवणूक दरम्यान बाळासाहेब आंबेडकर यांनी परिधान केलेली पगडी ही आकर्षणं ठरली; मात्र ही टोपी त्यांना कोणी घातली आणि या टोपी खाली दडलय काय, अश्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं होतं.
भारतीय अलंकार 24
अकोला : इंडियाची सत्ता आली तर चॅनल्स बंद करू , असा इशारा मीडियाला द्या,असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी इंडियातील नेत्यांना दिला.
ते बुधवारी सायंकाळी अकोल्यात बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित धम्म मेळाव्यात बोलत होते. तर चॅनल्स आणि वर्तमानपत्र विकल्या गेल्याचा आरोप ही यावेळी आंबेडकरांनी केला.
यावेळी त्यांनी इंडियाच्या नेत्यांसोबत नरेंद्र मोदी आणि आरएसएस वरही जोरदार टीका केली.
मोदींना इंग्रजी येत नाही आणि त्यामुळे बायडन यांनी बोललेलं मोदींना समजलं नाही आणि त्यामुळे G 20 मध्ये मोदी सोबतच देशाचीही इज्जत गेली असल्याची टीका त्यांनी केली.
मोदींचा वर्गमित्राला आपण भेटलो असता आम्ही 9 वी नापास आहो, अस म्हणत आंबेडकरांनी मोदींची खिल्ली उडवली.
आम्हाला इंडियात घेतलं नाही तरी काही फरक पडत नाही मात्र मोदींना प्रश्न विचारा असा खोचक टोला त्यांनी इंडियातील नेत्यांना लगावला.
ज्यांच्या कडे 500 च्या नोटा आहेत त्यांनी 200 आणि 100 च्या नोटा करून घ्यावा, असा सल्ला यावेळी उपस्थितांना आंबेडकरांनी दिला.कारण निवडणुका जवळ येताच मोदी नोटा बदलतात असा आरोप त्यांनी केला.
येणाऱ्या काळात महागाई वाढणार , गोध्रा आणि मणिपूर सारख्या घटना देशात अनेक ठिकाणी होणार असल्याचे ते म्हणाले.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा