ganesh visarjan 2023: विना पोलीस बंदोबस्तात बाळापूरात शांततेत पार पाडली गणेश विसर्जन मिरवणूक




भारतीय अलंकार 24

अकोला : गणेश विसर्जन म्हंटल की पोलिसांचा मोठा फौजफाटा डोळ्यासमोर येतो. समाजकंटकांवर दृष्टी ठेवण्यासाठी आणि विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त मिरवणूक दरम्यान लावण्यात येतो. मात्र 28 सप्टेंबर रोजी राज्यभरात गणेश विसर्जन सुरू असताना अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरात श्रींची विसर्जन मिरवणूक विना पोलीस बंदोबस्तात सुरू होते. विशेष म्हणजे या उपक्रमाला ' माझा बाप्पा माझी मिरवणूक ' नाव देण्यात आलं होत. 





बाळापूरचे पोलीस निरीक्षक अनिल जुमळे यांच्या प्रयत्नाने, मंडळ आणि नागरिकांना विश्वासात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला.



बाळापूर येथे गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत एकूण 17 सार्वजनिक गणेश मंडळांनी सहभाग नोंदविला. या प्रत्येक मंडळातील 5 सदस्यांना मंडळांना शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक पार पडण्याची जवाबदारी देण्यात आली होती. यामुळे या संपूर्ण मिरवणुकीत पोलीस कुठं ही दिसून येत नव्हते, तर मुस्लिम बांधवांनी मंडळ अध्यक्षांचा फुलहार घालून स्वागतही केलं. नागरिकांच्या मदतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे.



टिप्पण्या