farmers-protest-in-vidarbha: शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मंत्र्यांचा गळा पकडून त्यांना रस्त्यावर आणू- रविकांत तुपकर यांचे खळबळजनक वक्तव्य




भारतीय अलंकार 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला:  शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मंत्र्यांचा गळा पकडून त्यांना रस्त्यावर आणू, असे खळबळजनक वक्तव्य शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केलं आहे. रविकांत तुपकर सध्या कापूस आणि सोयाबीनच्या प्रश्नांसाठी विदर्भ दौऱ्यावर आहेत ते शुक्रवारी अकोल्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.



कापूस, तूर, सोयाबीन, संत्री या पिकांना भाव मिळण्यासाठी 1 ते 20 नोव्हेंबर पर्यंत विदर्भातून एल्गार रथ यात्रा काढणार असून शेगाव येथुन यात्रेला प्रारभ होणार आहे. 20 नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या लाखोंच्या संख्येत एल्गार यात्रेचा समारोप बुलढाणा येथे होणार असल्याचे तुपकर यांनी सांगितले.




सरसकट सर्व पिकांना एकरी दहा हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी. तर सोयाबीनला प्रति क्विंटल नऊ हजार रुपये. कापसाला 12 हजार 500 रुपये भाव मिळावा. अशी आमची प्रमुख मागणी असल्याचे तूपकर यांनी सांगितले.


सध्या सुरू असलेल्या दौऱ्यात हजारों शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या असून, 1 नोव्हेंबर पासून बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथून एल्गार यात्रा काढणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं तर 20 नोव्हेंबरला सरकारला आम्ही नमवू असंही ते म्हणाले. निवडून दिलेल्या आमदार , खासदारांच्या गाड्या आडवा आणि सोयाबीन कापूस विषयी त्यांना प्रश्न विचारा, असे विधानही त्यांनी यावेळी केले. 


या मोर्चामध्ये बळीराजाची ताकद काय असते? ते आम्ही सरकारला दाखवून देऊ, सोयाबीन, कापूस, संत्री उत्पादकांच्या मागण्या सरकारने जर मान्य केल्या नाही तर विद्यमान सरकार मधील मंत्र्यांना आम्ही रस्त्यावर फिरणेही  मुश्किल करू, असा इशारा तुपकर यांनी दिला.



पीक विमा कंपन्यांनी यावर्षी शेतकऱ्यांना फसवलं आहे. यामध्ये कंपन्यांच व सरकारचं लागेबांधे असल्याचा आरोप तुपकर यांनी केला.










टिप्पण्या