- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
court news: नोकरीचे आमिष दाखवून इसमास परदेशी गुलामी साठी विकणाऱ्या फरार आरोपींची मालमत्ता जप्त करण्याचा आदेश पारित
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
. फिर्यादी तर्फे वकील
कबुतरबाजी प्रकरणातील फरार आरोपींची अचल संपत्ती जप्त करण्याचे आदेश
ॲड. नीलिमा शिंगणे जगड
अकोला: नोकरीचे आमिष दाखवून इसमास परदेशी गुलाम म्हणून विकणाऱ्या फरार आरोपींची अचल संपत्ती जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने जिल्हाधिकारी यांना देवून पूर्तता अहवाल सादर करण्याचे यात सांगितले आहे.
हकीकत अशा प्रकारे आहे की, याकुब खान अजीज खान रा. खिडकीपुरा, जुने शहर, अकोला यांचे जावाई शेख उमर शेख मुसा रा. अंबावाडी, सुरत (गुजरात) यांना आरोपी (१) नुरूलहुदा खान गफुर खान (२) मो. जिशान खान तथा (३) सुरज बत्रा, सर्व रा. मुंबई यांनी शेख उमर शेख मुसा याला सौदी अरब येथे ड्रायव्हरची नोकरी लावुन दिल्याबाबतचे आमिष दाखवून त्याचे कडुन पैसे घेवून त्याला सौदी अरब येथे राहणारे मोहम्मद अब्दुल्ला यांना विकले होते व मोहम्मद अब्दुल्ला हा त्यांचे सोबत गुलामा सारखे वागवत होता, व त्याला कोणताही पगार न देता त्यास कोंडुन ठेवत होता व कोणतीही पगार देत नव्हता. मोहम्मद उमर यांनी कसा बसा त्यांचे सासरे याकुब खान यांना त्याचे सोबत होत असलेल्या अत्याचार व धोकाधडीची सुचना दिली, त्यावर याकुब खान यांनी आरोपी लोकां विरूध्द तक्रार दिली होती व त्यानंतर न्यायालयात प्रकरण दाखल केले होते.
या प्रकरणामध्ये आरोपी सुरवाती पासुन त्यांना समन्स मिळुन सुध्दा गैरहजर होते व न्यायालयाचे आदेश असुन सुध्दा न्यायालया मध्ये हजर होण्यास कसुर करीत होते. त्यावर फिर्यादीचे अधिवक्ता यांनी आरोपी लोकांविरूध्द फौ.प्र. संहितेचे कलम ८२ अंतर्गत त्यांना फरार घोषित करण्याकरिता अर्ज दाखल केला होता, तो अर्ज मंजुर करून न्यायालयाने आदेश पारित केले होते, तरी सुध्दा आरोपी लोक हजर न झाल्यामुळे फिर्यादीचे अधिवक्ता यांनी आरोपी लोकां विरूध्द फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम ८३ अंतर्गत आरोपी लोकांची अचल संपत्ती जप्त करण्याकरिता अर्ज केला होता, त्यावर दोन्ही पक्षाचे युक्तीवाद ऐकुन न्यायालयाने अर्ज मंजुर करून आरोपी लोकांची अचल संपत्ती जप्त करण्याचा आदेश जिल्हाधिकारी अकोला यांना देवून त्याबाबतचा पुर्तता अहवाल सादर करण्याचे आदेश पारित केले आहे.
या प्रकरणा मध्ये फिर्यादी तर्फे ॲड. अली रजा खान, ॲड. अय्युब नवरंगाबादे यांनी काम पाहिले.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा