- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार 24
अकोला : जालना येथे मराठा कार्यकर्त्यांवर झालेल्या लाठीचार्जचे तीव्र पडसाद अकोल्यातही उमटले. अकोल्यात शनिवारी वंचित बहुजन आघडीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला.
शहरातील यमुना संकुल शकील गॅरेज जवळ पीकेव्ही कडे जाणाऱ्या मार्गावर रस्ता रोको करीत हे आंदोलन करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीने अचानक पुकारलेल्या या आंदोलन स्थळी पोलीस पोहचू शकले नाहीत. यावेळी मात्र पोलिसांची तारांबळ उडाली होती.
वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काल ट्विट करून मराठा आरक्षणाला पाठिंबा जाहीर करून राज्यभर आंदोलन पुकारणार असल्याचं म्हंटल होते.
अकोल्यात झालेल्या या आंदोलनामुळे या रस्त्यावरील वाहतूक काही वेळासाठी विस्कळीत झाली होती. यावेळी वंचितच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप मधिल नेत्यांसाठी ' षंढ ' असा शब्द प्रयोग करून निषेध नोंदविला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा