court news: ग्राम सेवकास मारहाण, सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपातून आरोपींची र्निदोष मुक्तता



भारतीय अलंकार 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: ग्राम सेवकास मारहाण करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपातून न्यायलयाने दोन आरोपींची र्निदोष मुक्तता केली आहे.



थोडक्यात हकीकत अशी आहे की, मुर्तिजापूर तालूक्यातील नागपुर ग्राम पंचायत मध्ये ग्राम सेवकच्या पदभार घेण्यासाठी गेलेल्या फिर्यादी  भारसाकळे यांना पदभार घेण्यापासून आरोपी क्र.१ गजानन कैथवास व आरोपी क्र. २ नारायण व्यास यांनी संगनमत करून ग्राम सेवकचा पदभार घेण्यास रोकले असून, लोटलाट करून लाथाबुक्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देवून शासकीय कामात अडथळा निर्मााण केला व पदभार घेण्यास प्रतिबंध केला अश्या फिर्यादीच्या रिपोर्ट वरून पो.स्टे. मुर्तिजापुर ग्रामीण यांनी अपराध क्र. १०/१६ कलम ३५३, ३२३, ५०६ भा.द.वि. प्रमाणे गुन्हा नोंदवून तपासा अंती दोषारोप पत्र दाखल केले.


सदर खटल्या मध्ये सरकार पक्षाने एकुण ७ साक्षीदार तपासले असून त्यांच्या उलट तपासा मध्ये आणलेली तफावत न्यायालयाच्या निदर्शनासआणून दिली या तथ्याला ग्राहय धरून सरकार पक्ष आरोपी विरूध्द गुन्हा सिध्द करू शकले नाही म्हणून दोन्ही पक्षांचे युक्तीवाद ऐकल्या नंतर वि.तदर्थ सत्र न्यायाधीश ए.के. काळे यांनी दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणा मध्ये आरोपी क्र. १ व २ तर्फे ॲड. अय्युब नौरंगाबादे व ॲड. अली रजा खान यांनी आरोपींची बाजु मांडली.

टिप्पण्या