court news: महावितरणचे कर्मचा-यांसोबत शिवीगाळ व मारहाण केल्याच्या आरोपातून आरोपींची निर्दोष सुटका




भारतीय अलंकार 24

अकोला:  म.रा.वि.वि. कंपनी मर्यादित कर्मचारी नागेश्वर मनोहर कुलमेथे यांनी पो.स्टे. मुर्तिजापुर येथे १६/०६/२०१७ रोजी रिपोर्ट दिला होता की, फिर्यादी व सौरव देशपांडे, प्रमोद तेलगोटे, शंकर यादव, संदीप वाघ, कुणाल हजारे असे वीज बिलाच्या थकबाकी वसुली करीता आंबेडकर चौकाच्या पाठीमागे कश्मीरा मेडीकल येथे गेले, आणि सौरव देशपांडे यांनी कश्मीरा मेडीकल यांचे मालकाकडुन वीजबील थकबाकी आणण्यास सांगीतले, असता शेख रिजवान शेख खलील यांनी वीज बिल भरण्यास नकार दिला व फिर्यादीला शिवीगाळ करून मारहाण केली होती. तेंव्हा मेडीकल मध्ये हजर असलेले शेख गुड्डु शेख खलील, शेख वसीम शेख बशीर यांनी सुध्दा फिर्यादीला शिवीगाळ करुन मारपीट केली होती. त्यावर मुर्तिजापुर पोलीस स्टेशन येथे आरोपी लोकांविरुध्द कलम ३५३, ३२३, ५०४, ३४ अंर्तगत गुन्हा दाखल करण्यात आला होता.  




प्रकरणातील दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. हा खटला वि. तदर्थ सत्र न्यायाधिश  ए. के. काळे  यांचे न्यायालयात चालला. प्रकरणात सरकार पक्षाने एकुण सात साक्षीदार तपासले असुन साक्षीदाराच्या उलट तपासा मध्ये आणलेल्या तफावत व तथ्य आरोपीच्या वकीलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणुन दिली व दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर वि. न्यायाधिश यांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली.




या प्रकरणा मध्ये आरोपी क्र. १ ते ३ यांच्या तर्फे ॲड. अलीरजा खान व ॲड. अय्युब नवरंगाबादे यांनी काम पाहिले व ॲड. अब्दुल शफीक व ॲड. रिजवान पठाण यांनी सहकार्य केले.

टिप्पण्या