Akola railway station : अखेर रेल्वे स्थानक प्रवेशद्वारावर शिवसेनेने (उबाठा गट) पुन्हा लावले नामफलक ; छत्रपति शिवाजी महाराजांचा जयघोष…



ठळक मुद्दा

येत्या सात दिवसांच्या आत डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार लागेल 





भारतीय अलंकार 24

अकोला: गेल्या 12 जुलै 2011 रोजी  रेल्वे स्टेशनमध्ये प्रवेश करण्यासाठी  शहराच्या बाजूने  छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार असे 2 प्रवेशद्वार उभे केले होते. मात्र  रेल्वे प्रशासनाने  विकास करण्याच्या नावाखाली हे दोन्हीं प्रवेशद्वार काढून टाकले होते.  हे प्रवेशद्वार जसेच्या तसे विनाविलंब उभे करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने शहरप्रमुख राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे स्थानकांवर आंदोलन केले होते. 



त्यावेळी रेल्वे प्रशासनाने तात्काळ ते दोन्ही प्रवेशद्वार उभे करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, रेल्वे प्रशासनाने आश्वासन पाळले नाही; म्हणुन आज पुन्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगर चे वतीने छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार नामफलक लावण्यात आले आहे. यावेळी येत्या सात दिवसांच्या आत डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार लागेल, असा विश्वास अकोला रेल्वे प्रशासनाने दिला आहे.


फटाक्यांची आतिषबाजी, बँडचा नाद आणि छत्रपति शिवाजी महाराजांचा जयघोष करीत शिवसैनिकांनी नाम फलक प्रवेशद्वारावर चढविले. त्यावर भगवे झेंडे फडकविले. यावेळी रेल्वे पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता.



यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली मंगेश काळे, गजानन बोराडे, तरुण बगेरे, सुरेंद्र विसपुते, अभय खुमकर, नितीन मिश्रा, देवेश्री ठाकरे, सुनीता श्रीवास, वर्षा पिसोड, मंजुषा शेळके, रेखा राऊत, सीमा मोहडकर, विशाल घरडे, गजानन चव्हाण, संजय अग्रवाल, विजय परमार, राजदीप टोहरे, आकाश राऊत, मोंटू पंजाबी, प्रकाश वानखडे, अंकुश सित्रे, किरण येवलकर, मुन्ना उकर्डे, रुद्राक्ष राठोड,  सुनील दुर्गया, रोशन राज, अमित भिरड, पवन शाईवाले, देवा गावंडे, किरण ठाकूर, छोटू धुर्वे, अविनाश मोरे, श्याम रेडे, दिनेश श्रीवास, गणेश बंदले, योगेश कानापुरे, आदेश अंधारे, ऋषीं राठी, भावेश शर्मा, योगेश कचनपुरे, मनीष भोबडे, सोनू ठाकूर, गणेश भोसले, गोपाल जाधव, दशरथ मिश्रा, पवन वसू, गजानन हुशे, विजय तिथले, कार्तिक झापडे, ललित माळी, सुरेश इंगळे, गोपाल लवाळे, राधे श्रीवास, उमेश टेकाडे, संदीप पत्की, रामेश्वर पळूलकर, अश्विन पांडे, ललित पांडे, अभिषेक मिश्रा, अमित मिश्रा, धीरज मिश्रा, शुभम वसणकर, पंकज बाजोड, अण्णा पलेलू, अविनाश मोरे आदींची उपस्थिती होती.

टिप्पण्या