Srimad-Bhagavat-katha-akola: कृष्णा-सुदामा मित्र भेटीच्या प्रसंगाने केली श्रीमद भागवत कथेची पूर्णाहुती



भारतीय अलंकार 24

अकोला: पुरुषोततम मास निमित्ताने स्व कृपाशंकर मिश्रा यांच्या स्मरणार्थ राजेश मिश्रा परिवार अकोला यांच्या वतीने खाटू श्याम मंदिर येथे 10 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट दरम्यान श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते. कृष्णा-सुदामा मित्र भेटीच्या प्रसंगाने श्रीमद भागवत कथेची पूर्णाहुती झाली.



चित्रकूट धाम येथिल नितिनदेव महाराज यांच्या ओजस्वी वाणीतून कथा वाचण्यात आली. मानवी जीवनात आपल्याकडून  झालेल्या पापाना नष्ट करण्यासाठीच चारधाम यात्रा, वैष्णो देवी यात्रा केली जाते.  या तीर्थ यात्रांमधून नष्ट होणारे पाप केवळ श्रीमद भागवत कथा प्रारंभपूर्वी होणाऱ्या कलश यात्रेत सहभागी झाले तर सर्व पाप नष्ट करण्या इतके पुण्य प्राप्त होते, असे आज भागवत कथेचे  पूर्णाहुती पुष्प गुंफताना पहिल्या सत्रात चित्रकूट धाम निवासी नितिनदेव महाराज यांनी भागवत कथा मंडपात केले.  तर पूर्णाहुती सत्रात कृष्णा, सुदामा मित्र भेटीचा जीवंत देखावा सादर करतांना भागवत कथा मंडपात उपस्थीत सर्व भाविकांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले आणि सर्वच भावुक झाले होते. आज बुधवारी भागवत कथेचे पूर्णाहुती पुष्प गुंफताना नितिनदेव महाराज यांनी श्रीमद भागवत कथा आयोजन मागील हेतू हाच आहे की, आपल्या अपत्यांना शिक्षणासोबच आजी आजोबा यांचेकडून मिळणारे संस्कार आणि संतांचे सत्संग याचे महत्व सांगणे अत्यावश्यक आहे, असा उपदेश नितीन देव महाराज यांनी केला.






काल मंगळवारी  श्रीकृष्ण रासलीला  विस्तारपूर्वक  सांगताना श्रीकृष्ण रासलीला मध्ये  पुर्व जन्मातील संत आणि सर्व देव सहभागी होण्यासाठी  प्रयत्न करीत असताना भगवान भोले हे  श्रीकृष्णाची बासरी बनून आले त्यामुळें मथुरा  वृंदावन मधील गोपिका  यांना ईर्षा होत होती. कारण श्रीकृष्ण बासरीला ओठाशी लावुन मधुर आणि गोड आवाजात सगळ्यांना  वश करते यामुळे गोपिका यांना ईर्षा होत होती. त्याच बासरी प्रमाणे आपण सर्वांनी वागण्याचा प्रयत्न केला तर दैंनदिन जीवनात बोलण्याची गरज पडली तर कमी बोला मात्र गोड बोला कुणाचेही मन  दुखावणार नाही याची काळजी घ्या, असे वागल्याने उध्दार झाल्याशिवाय राहणार नाही असा उपदेश नितिनदेव महाराज यांनी श्रीमद भागवत कथेचे सहावे पुष्प गुंफताना केले  होते.  भागवत कथेत दररोज आयोजक व भाविक भक्तांच्या वतीने विवीध धार्मिक  जिवंत देखावे सादर करण्यात आले.  




भागवत कथेच्या पहिल्या दिवशी श्रीकृष्णाचा देखावा, शंकर पार्वती  देखावा,  हिरण्या कश्यप, भगवान नृसिंह आणि भक्त प्रल्हाद  वामन, वासुदेव, यशोदा आणि श्रीकृष्ण जन्मोत्सव , माखन चोरी, गोवर्धन पर्वत, काल  रुख्मिणी विवाह आणि आज बुधवारी पूर्णाहुती पुष्प गुंफताना विस्तारपूर्वक श्रीमद भागवत कथेचे महत्व, पुण्य, आणि संस्कार, शिक्षण याबाबत उपदेश करतांना कृष्णा सुदामा मित्र भेटीने श्रीमद भागवत कथेची  पूर्णाहुती केली. यानंतर संध्याकाळी महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला.   




ही भागवत कथा यशस्वी करण्यासाठी अरुण शर्मा, नितिन मिश्रा, सूरज भिंडा, दिनेश श्रीवास, दीपक अग्रवाल, अनिल भुटियानी गोपाल लव्हाले, गणेश बुंदेले, पिंटू मिश्रा यांनी आपली सेवा दिली तर मंचसंचलन महेन्द्र जोशी यांनी केले .



टिप्पण्या