court news: वाहन रिफ्लेक्टर बनावट प्रमाणपत्र व फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपीला जामीन मंजूर

         ॲड. रमेशकुमार रामनानी 




भारतीय अलंकार 24

अकोला: नवीन अवजड वाहनांच्या पासिंगसाठी महत्त्वाच्या दर्जाचे रिफ्लेक्टर बसविण्याबाबत आवश्यक प्रमाणपत्रे बनावट तयार करून शासनाने नियुक्त केलेल्या कंपनीची फसवणूक करून परिवहन विभागाची कोट्यवधी रुपयांची लूट करणाऱ्या पथकाचा पर्दाफाश झाला होता.  यामध्ये गुन्हा क्र. 111/2023  भा. दं.वि. कलम 419, 420, 468 व 66 (ड) ची  माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 अंतर्गत गुन्हे नोंदवून आरोपीला शहर कोतवाली पोलीस स्टेशनने सोलापूर येथून अटक केली होती. न्यायालयाने पोलीस कोठडी दिल्यानंतर आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली होती.  आज मुख्य न्यायदंडाधिकारी अकोला न्यायालयाने यातील मुख्य आरोपीचा जमानत अर्ज मंजुर केला. न्यायालयात आरोपीची बाजू अधिवक्ता रमेशकुमार पिंजोमल रामनानी यांनी मांडली अधिवक्ता नितीन सुभाष महाल्ले, अधिवक्ता निरज भिकुसिंग राजपूत यांनी सहकार्य केले.


असे आहे प्रकरण 

नवीन अवजड वाहनांच्या पासिंगकरिता सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले उच्च दर्जाचे रिफ्लेक्टर लावण्यासाठी आवश्यक असलेले प्रमाणपत्र बनावट तयार करून शासनाने नियुक्त केलेल्या कंपनीची फसवणूक करणाऱ्या व परिवहन विभागाचा कोट्यवधींचा महसूल लुटणाऱ्या सोलापुरातील मोठ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला होता. सिटी कोतवाली पोलिसांनी प्रकरणातील म्होरक्यास अटक करून त्याला न्यायालयात हजर केले होते. यानंतर आरोपीची तरुंगात रवानगी करण्यात आली होती. सुरक्षेच्या दृष्टी नवीन अवजड वाहनांना परिवहन विभागाच्या नियमानुसार रिफ्लेक्ट लावून त्यानंतर प्रमाणपत्र देण्यासार मेसर्स अडव्हान्टेक असोसिएट् एलएलपी ही कंपनी नियुक्त केलेली आहे. मात्र, सोलापुरातील आरोपी या कंपनीच्या समांतर दुसरी वेबसाइट तयार करून बोगस प्रमाणपत्र तयार करून रिफ्लेक्टर लावण्याचा सपाटाच सुरु केला होता. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली होती. याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम 419, 420, 408 अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असता, अक्षय याने साईट तयार करून त्याआधारे बनावट प्रमाणपत्र तयार करून उच्च दर्जाच्या परावर्तक टिप्स म्हणजेच रिफ्लेक्टर लावण्याच्या नावाखाली हेराफेरी सुरु केली होती. या माध्यमातून त्याने शासनाला कोट्ट्यवधी रुपयांना चुना लावत संबंधित कंपनीचीही फसवणूक केल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर सिटी कोतवाली पोलिसांनी या आरोपीस अटक केली होती.



टिप्पण्या