court news: अल्पवयीन चुलत बहिणीवर लादले मातृत्व; आरोपी भावास 10 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा




भारतीय अलंकार 24

ॲड.नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: अल्पवयीन चुलत बहीण घरी एकटी असल्याची संधी साधत वारंवार अतिप्रसंग करुन मातृत्व लादणाऱ्या भावास अकोला न्यायलयाने 10 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे.


आज 3 ऑगस्ट रोजी विद्यमान एस. जे. शर्मा, अतिरिक्त सह जिल्हा व सत्र न्यायालय, (विशेष न्यायालय) अकोला येथे या सत्र खटल्याचा निकाल दिला आहे. पो.स्टे. सिव्हिल लाईन्स अकोला अंतर्गत हा  सत्र खटला दाखल करण्यात आला होता.



बहीण भावाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारा आरोपी पंकज (वय: ३२ वर्षे) याने त्याची चुलत बहीण घरी एकटी असताना तिचे सोबत वारंवार अती प्रसंग केला. ही बाब कोणाला सांगितली तर तिचे वडिलांना जिवे मारण्याची धमकी दिली. पिडिता गरोदर असल्याने तिला जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला येथे भरती केले असता, तिथे तिची प्रसूती झाली. पीडिता अल्पवयीन असल्याने डॉक्टरांनी ही बाब पोलिसांना कळवली व चौकशी मध्ये सदर गुन्हा घडल्याची बाब उघडकीस आली होती. 




10 फेब्रुवारी 2015 रोजी चौकशी दरम्यान पीडितेच्या घेतलेल्या बायानानुसर सदर गुन्हा नोंदवण्यात येवून आरोपींवर सदर खटला चालवण्यात आला. 




या प्रकरणात सरकार तर्फे एकूण 7 साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील किरण खोत यांनी बाजू मांडली. प्रकरणाचा तपास तत्कालीन PSI संजय रामहीत मिश्रा यांनी केला. पोस्टे पैरवी म्हणून H C गावंडे व Cms पैरवी PC प्रिया गजानन शेंगोकार यांनी सहकार्य केले.साक्ष पुरावा ग्राह्य धरून आरोपीस  शिक्षा ठोठावण्यात आली.


              

असा आहे निकाल 

कलम 235 crpc अन्वये आरोपी दोषी.

 

कलम 376(2)(फ) ipc मध्ये 10 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा व 5000/- रु दंड, दंड न भरल्यास एक वर्ष साधा कारावास.


कलम 506 मध्ये 1 वर्ष सक्त मजुरी शिक्षा व 5000/- रू दंड, दंड न भरल्यास 1 महिना साधा कारावास. 


एकूण दंड रु 10000/- सर्व शिक्षा आरोपीस एकत्रित भोगवयाच्या आहेत.



या प्रकरणात घटनेच्या वेळी पीडिता अल्पवयीन होती. या बाबत समाधानकारक पुरावा उपलब्ध न झाल्याने पोक्सो कायद्याच्या संबंधित कलमा मधून आरोपीस निर्दोष सोडण्यात आले. 





(टिप: पिडीतेची ओळख जाहीर होऊ नये, याकरिता आरोपीचं पूर्ण नाव व पत्ता नमूद केला नाही.)

टिप्पण्या