Water supply in Akola city : अकोला शहरातील पाणी पुरवठा तीन दिवसासाठी बंद




भारतीय अलंकार 24

अकोला: केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियान अंतर्गत Scada व Automation चे कामामधील Flow Meter बसविणे व valve बसविण्याचे कामासाठी 65 MLD जलशुद्धीकरण केंद्रावरून अकोला शहराला होणारा पाणीपुरवठा 23, 24 व 25 जुलै 2023 रोजी बंद राहील.  



या जलकुंभ परिसरातील पाणी पुरवठा बंद 

ज्‍यामध्‍ये महाजनी प्लॉट, तोष्णीवाल लेआऊट, आदर्श कॉलोनी, केशव नगर, नेहरु पार्क, रेल्वे स्टेशन, अकोट फैल, गंगा नगर, जोगळेकर प्लॉट, लोकमान्य नगर, गुडधी, उमरी, शिवणी, शिवर जलकुंभांचा समावेश असून या जलकुंभ परिसरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.  


येथे पाणी पुरवठा सुरळीत 

तसेच 25 MLD प्लांट वरून होणारा शिव नगर आश्रय नगर व बस स्टॅन्ड मागील जलकुंभावरून होणारा पाणी पुरवठा सुरळीत राहणार आहे.  


नागरिकांना आवाहन 

अकोला शहरातील नागरिकांनी पाण्‍याची पुरेशी साठवणूक करून पिण्‍याच्‍या पाण्‍याच्‍या अपव्‍यय टाळून सहकार्य करावे, असे आवाहन मनपा पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल डोईफोडे यांनी केले आहे.


          

                                                                                    

टिप्पण्या